जिल्हा परिषद पेन्शनरची प्रलंबित प्रकरणे निकाली काढा
जिल्हा परिषद पेन्शनरची प्रलंबित प्रकरणे निकाली काढा
सीईओ जितीन रहेमान यांना सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे निवेदन
बीड (एस.एम.न्युज़) - जिल्हा परिषद पेन्शनरची प्रलंबित प्रकरणे निकाली काढा अशी मागणी करणारे निवेदन बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहेमान यांना सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेकडून देण्यात आले.
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष शेख वजीर, राज्य सरचिटणीस डी.एम.राऊत, राज्य कार्याध्यक्ष रामहरी घुले, राज्य उपाध्यक्ष शहाजीराव कदम, राज्य कोषाध्यक्ष ओंकार बडसल, राज्य मार्गदर्शक बाबुराव उबाळे, संघटनेचे राज्य सदस्य गोविंद रसाळ, शाम मार्कंडे, प्रविण बुंदेले ईत्यादी च्या वतीने बीड जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहेमान यांना संघटनेने जि.प.पेन्शनरच्या विविध प्रलंबीत मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करुन प्रलंबीत प्रकरणे लवकर निकाली काढण्यासाठी निवेदन दिले. यावर मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी विभागाशी चर्चा करुन सर्व प्रलंबीत प्रकरणे निकाली काढण्याची नियमाप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*


कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा