भ्रष्टाचाऱ्यांचे वाभाळे काढणारा; अन्याय अत्याचाराचा बिमोड करू पाहणारा संपादक दीपक इंदरराव थोरात
भ्रष्टाचाऱ्यांचे वाभाळे काढणारा; अन्याय अत्याचाराचा बिमोड करू पाहणारा संपादक दीपक इंदरराव थोरात
सायं. दैनिक महाराष्ट्र आरंभ च्या वर्धापन दिनास एस.एम.न्युज़ परिवाराकडून भरभरून शुभेच्छा
बीड (एस.एम.न्युज़) - समाजात वावरताना अनेकजण आपापल्या परीने जीवन जगताना दिसतात. काहीजण फक्त आपल्या पुरते तर काही आपल्या कुटुंबीयापुरते जगत असल्याचेही दिसते परंतु इतरांसाठी झटणारे, त्यांच्या अडीअडचणीला धावून जाणारे, त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे मोजकेच असतात. यातीलच एक म्हणजे बीड येथून प्रकाशित होणारे सायं. दैनिक महाराष्ट्र आरंभचे संपादक दीपक इंदरराव थोरात हे आहेत. काही वर्षांपूर्वीपर्यंत ऑटो रिक्षा चालविणारा हा तरुण कुणाच्या ध्यानीमनी नसताना अचानक महाराष्ट्र आरंभ नावाचे वृत्तपत्र काढतो. ज्या बीड जिल्ह्यामध्ये अगोदरच वृत्तपत्रांची सर्वात जास्त जंत्री आहे, त्या बीड जिल्ह्यातून दैनिक वृत्तपत्र काढणे हे येऱ्यागबाळ्याचे काम नक्कीच नाही पण दीपक थोरात ने हा विडा उचलला आणि उचललाच काय तो सक्षमपणे पेलला सुद्धा. बघता बघता महाराष्ट्र आरंभ दैनिकाला दोन वर्ष पूर्ण झाली. या दोन वर्षांच्या काळात दैनिक चालविताना अनेक आवाहने आणि अडचणी समोर आल्या तरी त्यास धिरोदात्तपणे तोंड देत दीपक थोरात नावाच्या या ४२ वर्षीय तरुण पठ्ठ्याने आपल्या दैनिकाच्या माध्यमातून भ्रष्टाचाऱ्यांचे वाभाळे काढले व काढत आहे. अन्याय अत्याचाराचा बिमोड करू पाहत आहे. अशा धडाकेबाज कार्याला पाहून बघता बघता दोन वर्षातच सायं. दैनिक महाराष्ट्र आरंभ वाचक प्रिय दैनिक म्हणून नावारूपास आले आहे. याची प्रचिती दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात दिसून आली. या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात समाजातील प्रत्येक क्षेत्र मग ते शासकीय, प्रशासकीय, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक कोणतेही असो प्रत्येक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांची दीपक थोरात यांचे अभिनंदन करून शुभेच्छा देण्यासाठी अक्षरशः मांदियाळी दिसून आली. याप्रसंगी एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनीही ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक रमेशराव गंगाधरे यांच्या सोबत संपादक दीपक इंदरराव थोरात यांना भरभरून हृदयी शुभेच्छा देत पुढील काळात सुद्धा त्यांची अशाच प्रकारे दमदार वाटचाल सुरू राहावी अशा सदिच्छा व्यक्त केल्या.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*


कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा