डॉक्टर्स, इंजिनीयर चा हृदयी सत्कार सोहळा थाटात संपन्न
डॉक्टर्स, इंजिनीयर चा हृदयी सत्कार सोहळा थाटात संपन्न
माजी सभापती सय्यद इलयास भाया यांचे आयोजन
एस.एम.युसूफ़, शेख लईख़, मुहम्मद अब्दुल गफ़्फ़ार, रमेशराव गंगाधरे
मुहम्मद अब्दुल गफ़्फ़ार, डॉ. अब्दुल फ़ैज़ खान, शेख फहीम, शेरखान पठाण
बीड (एस.एम.न्युज़) - शहरातील चार डॉक्टरांना आयुष महासन्मान पुरस्कार २०२५ मुंबईत मिळाल्याने तसेच जल अभियंता परीक्षेत विशेष प्राविण्याने यश मिळविणारे यांचा हृदयी सत्कार सोहळा बीड नगर परिषदेचे माजी सभापती सय्यद इलयास भाया यांनी गॅलेक्सी नेचरोपॅथी क्लिनिक खंदक येथे आयोजित केला होता. हा सत्कार सोहळा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
वैद्यकीय क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर देण्यात येणारा आयुष महासन्मान २०२५ हा पुरस्कार डॉ. अब्दुल फ़ैज़ खान शेरखान, डॉ. टी.आर.काझी, डॉ. इमरान पठाण, डॉ. रईस सय्यद यांना नवी मुंबई येथे प्रदान करण्यात आला तसेच बीड येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून शिक्षण घेत जल अभियंता परीक्षेत विशेष प्राविण्याने उत्तीर्ण झालेले शेख लईख़ युसूफ़ यांचा सत्कार सोहळा बीड नगर परिषदेचे माजी सभापती सय्यद इलयास भाया यांनी आयोजित केला होता. या सत्कार सोहळ्यात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक रमेशराव गंगाधरे, मुख्याध्यापक शेरखान पठाण, समाजसेवक मुसाखान पठाण, धडाकेबाज युवा नेते मुहम्मद अज़हरुद्दीन उर्फ़ ए.एस.गोलू, संपादक शेख ताहेर, धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते शेख वसीम व ज़ैद क़ादरी, मुहम्मद अब्दुल गफ़्फार, शेख फहीम आणि एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सर्व उपस्थितांनी पाचही सत्कार मूर्तींना पुढील वाटचालीसह यशस्वीतेसाठी हृदयी शुभेच्छा दिल्या.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*





कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा