आघाडीतील शिलेदार आता शहरातील रस्ते तयार करून का घेत नाहीत?
आघाडीतील शिलेदार आता शहरातील रस्ते तयार करून का घेत नाहीत?
एस.एम.युसूफ़, सय्यद इलयास यांचा सवाल
पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार लक्ष देतील का?
बीड (एस.एम.न्युज़) -
शहरातील काही रस्त्यांची अवस्था ही अक्षरशः ओवाळून फेकल्यासारखी झाली आहे. तरीसुद्धा आघाडीचे शिलेदार याकडे लक्ष देत नाहीत. विशेष म्हणजे या शिलेदारांपैकी बरेचजण आता दस्तूरखुद्द बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार यांच्यासोबत आहेत. तरीही या शिलेदारांकडून या रस्त्यांसाठी कोणतेही कार्य केले जात नसल्याने जिल्हा रुग्णालय रस्त्याच्या निर्माणावेळी श्रेय घेतलेले शिलेदार या रस्त्यांसाठी का पुढे येत नाहीत? असा सवाल उपस्थित होवू लागला असून त्या सर्व शिलेदारांना जवळ केलेले अजित पवार याकडे लक्ष देतील का? असे प्रश्न एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ आणि एमआयएम चे सय्यद इलयास यांनी उपस्थित केले आहेत.
याविषयी सविस्तर वृत्त असे की, जवळपास ३० वर्षांपासून खितपत पडलेल्या जिल्हा रुग्णालयाच्या रस्त्यासाठी १० वर्षात १४ निवेदन, एका वर्षात व्यंगात्मक निषेध, भीक मांगो आणि बेशरम आंघोळ असे तीन आंदोलन आणि प्रसिद्धी माध्यमातून सातत्याने लक्ष वेधणारे एस.एम.युसूफ़ व सय्यद इलयास यांनी पाठपुरावा करत रान उठवले होते, तेव्हा कुठे जिल्हा रुग्णालयाचा रस्ता तयार करण्यात आला. जेव्हा या रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली तेव्हा आघाडीतील काही शिलेदारांनी हा रस्ता आमच्यामुळेच झाला अशी आवई उठविली होती. आता शहरातील दयनीय झालेले रस्ते चांगले तयार करण्यासाठी आघाडीतील तेच शिलेदार का पुढे येत नाहीत? असा सवाल उपस्थित होवू लागला असून बीड जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार याकडे लक्ष देतील का? असाही प्रश्न एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ आणि एमआयएम चे सय्यद इलयास यांनी उपस्थित केला आहे.
*बीड शहरातील दयनीय रस्ते*
१) छत्रपती शिवाजी महाराज चौक ते राजुरी वेस, कारंजा टॉवर, बलभीम चौक मार्गे चांदणी चौक पर्यंत चा रस्ता २) राजुरी वेस ते बुंदलपुरा, कबाड गल्ली मार्गे माळीवेस पोलीस चौकी पर्यंत चा रस्ता ३) कारंजा टॉवर ते जुनी भाजी मंडई मार्गे बुंदलपुरापर्यंतचा रस्ता ४) बलभीम चौक ते धोंडीपुरा मार्गे माळीवेस पर्यंत चा रस्ता ५) सुभाष रोड ते जिल्हा स्टेडियम चा रस्ता ६) किल्ला मैदान, कागज़ी दरवाजा, काली मस्जिद, भीम नगर परिसरातील रस्ते ७) अहेमदनगर रोड ते धानोरा रोड ८) मुहम्मदिया कॉलनी या मुस्लिम बहुल भागात असलेल्या सर्व नागरी वसाहतीतील सर्व रस्ते.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा