बनावट कागदपत्रांचा सिंडिकेट! माजलगावात माजी नगरसेवक सलीम उर्फ बापू सय्यद यांचा काळा चेहरा उघड?
बनावट कागदपत्रांचा सिंडिकेट! माजलगावात माजी नगरसेवक सलीम उर्फ बापू सय्यद यांचा काळा चेहरा उघड?
===============
मयताच्या तारखेलाच बनावटपणाचा खेळ; 1977 ला मयत दाखवून 2025 मध्ये वारस तयार करून बनावट कागदांचा खेळखंडोबा?
=================
बनावट प्रमाणपत्रांनी 40 एकर जमीन हडपण्याचा घोटाळा उघड; सलीम उर्फ बापू सय्यदांच्या बनावट कागदांचा अखेर भांडाफोड?
===================
इनामी जमीन घोटाळ्यांपासून फॉर्च्युनर-स्कॉर्पिओपर्यंत माजी नगरसेवक सलीम उर्फ बापू सय्यदांच्या काळ्या पैशाच्या साम्राज्यावर आयकर विभागाची नजर?
===================
बीड (प्रतिनिधी):- माजलगाव तालुक्यातील खरात आडगाव व निपाणी टाकळी परिसरातील खिदमत मास इनामी जमीन (सर्वे नं. 100, 210) बळकावण्यासाठी माजी नगरसेवक सलीम उर्फ बापू फक्त सय्यद यांनी बनावट मृत्यू प्रमाणपत्र व वारस प्रमाणपत्र तयार करून प्रचंड गैरव्यवहार केल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. या प्रकरणात माजी नगरसेवक सय्यद यांनी त्यांच्या पत्नी श्रीमती अफसाना सलीम सय्यद यांच्या नावावर 1977 मध्येच मृत झाल्याचे दाखवत श्रीमती मरियम बी अब्दुल रजाक यांचे खोटे मृत्यू प्रमाणपत्र माजलगाव नगरपरिषदे कडे सादर केले. त्यानंतर 2025 मध्ये याच नावाने पुन्हा बनावट वारस प्रमाणपत्र मिळवले.
प्रत्यक्षात मयत मरियम बी ह्या मांडवा, ता. वाशी, जि. उस्मानाबाद येथील रहिवासी होत्या व त्यांचा खरा मृत्यू 2001 मध्ये झाला होता. त्याची नोंद ग्रामपंचायत मांडवा येथे असून त्यांचा एकमेव वारस अब्दुल गफार अब्दुल रजाक असल्याचे 2007 मध्ये कळंब न्यायालयाने आदेशित केले आहे.
वारस प्रमाणपत्र काढण्याच्या आधीच, 2021 मध्ये सलीम सय्यद यांनी तत्कालीन उपजिल्हाधिकारी आघाव पाटील यांच्या संगनमताने ही 40 एकर इनामी जमीन खालसा करून घेतली आणि पत्नीच्या नावावर निर्णय नोंदवून घेतला. जमिनीचा मूळ मालक आणि वारस अस्तित्वात असतानाही बनावट कागदपत्रांवर विश्वास ठेवून न्यायालयाची फसवणूक करण्यात आली. त्यामुळे आता न्यायालयीन फसवणुकीप्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. सदरील माजी नगरसेवक कोणत्याही व्यक्तीने तक्रार केली तर त्यांच्यावर अॅट्रोसिटी, विनयभंग, बलात्कार यासारखे खोटे गुन्हे दाखल करून तक्रार मागे घेण्यास भाग पाडतो, अशी गंभीर आरोपांची नोंद आहे. सलीम उर्फ बापू सय्यद स्वतःला इनामी जमीन संघटनेचा अध्यक्ष म्हणून मिरवत असला तरी त्याच्या विरोधात इनामी जमीन घोटाळे, गायरान जमीन बळकावणे, संजय गांधी श्रावणबाळ योजनेंतर्गत चिरीमिरी घेणे असे गंभीर आरोप आहेत.
त्याच्या मुलगा समीर सलीम सय्यद कडे आज महागड्या फॉर्च्युनर, स्कॉर्पिओ गाड्या आणि मोठी प्रॉपर्टी असून, कुठलाही अधिकृत व्यवसाय नसताना एवढी संपत्ती उभी केल्याबद्दल आयकर विभागाचीदेखील चौकशी लवकरच होणार असल्याचे संकेत आहेत.
या प्रकरणात वकील अल्ताफ सय्यद यांनी बनावट वारस प्रमाणपत्रासाठी वकिलपत्र देऊन सहकार्य केले असल्याचा ठोस आरोप आहे. याच पद्धतीने मराठवाड्यातील सिरसाळा, परळी, अंबाजोगाई, जिंतूर, पाथरी, मानवत, परभणी, बीड, धारूर, माजलगाव अशा ठिकाणी अनेक इनामी जमीन प्रकरणांमध्ये बनावट वारस व बनावट कागदपत्रे तयार करून लाखो रुपयांचे व्यवहार करण्यात आले आहेत.
#चौकट-
प्रशासन आणि जनतेचे लक्ष वेधणारे प्रकरण?
हा घोटाळा उघड झाल्यानंतर संपूर्ण बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र राज्य महामंडळ, आयकर विभाग आणि न्यायालय या सगळ्या पातळ्यांवर आता कारवाई होण्याची चिन्हे दिसत आहेत. माजी नगरसेवक सलीम उर्फ बापू सय्यद व त्याचे साथीदार यांच्यावरती न्यायालयीन फसवणूक, इनामी जमीन हडप, काळा पैसा आणि दहशतशाहीचे गंभीर आरोप सिद्ध होत आहेत. त्यामुळे या कारवाईकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
#चौकट-
बनावटपणाचा फडशा आणि प्रशासनाची संगनमताने खेळी?
सलीम सय्यद यांनी 1977 मध्येच मरियम बी माजलगाव येथे मृत झाल्या असे दाखवत मृत्यू प्रमाणपत्र नगरपरिषदेकडे मिळवले. त्यानंतर 2025 मध्ये वारस प्रमाणपत्र काढून पत्नीच्या नावावर हक्क मिळवण्याचा डाव रचला. पण प्रत्यक्षात मरियम बी या उस्मानाबाद जिल्ह्यातील मांडवा येथील रहिवासी होत्या आणि त्यांचा मृत्यू 2001 मध्ये झाला होता. त्यांच्या वारस म्हणून अब्दुल गफार यांची ग्रामपंचायत व कळंब न्यायालयाने नोंद केली आहे.
वारस प्रमाणपत्र मिळवण्याआधीच 2021 मध्ये सलीम सय्यद यांनी उपजिल्हाधिकारी आघाव पाटील यांना हाताशी धरून जमीन खालसा करून पत्नीच्या नावावर नोंदवून घेतली. म्हणजेच न्यायालयीन व प्रशासकीय दोन्ही पातळ्यांवर संगनमताने फसवणूक घडवून आणली गेली.
चौकट-
दहशतीचा डाव आणि भूमाफियांचा साम्राज्य?
तक्रार करणाऱ्यांवर अॅट्रोसिटी, विनयभंग, बलात्कार यांसारखे खोटे गुन्हे दाखल करून गप्प बसवण्याची ही माजी नगरसेवकाची पद्धत असल्याचे अनेकांनी उघड केले आहे. सत्तेचा आणि पदाचा वापर करून दहशत निर्माण करणे हा त्यांचा जुना फंडा आहे. स्वतःला इनामी जमीन संघटनेचा अध्यक्ष" म्हणवून घेणारे सलीम सय्यद हे प्रत्यक्षात भूमाफिया असल्याचे आता स्पष्ट होत आहे.
सिरसाळा, परळी, अंबाजोगाई, जिंतूर, पाथरी, मानवत, परभणी, बीड, धारूर अशा ठिकाणीही बनावट वारस व खोटे कागदपत्रे तयार करून जमिनी हडप केल्याचा आरोप आहे.
माजी नगरसेवक सलीम उर्फ बापू फत्तु सय्यद व त्याचा मुलगा समीर सलीम सय्यद व त्यांची पत्नी अफसाना सलीम सय्यद सर्व बनावट वारस प्रमाणपत्र काढून देणाऱ्या वकील अल्ताफ सय्यद यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये असे बनावट कागदपत्र तयार केलेले आहेत या सर्व कागदपत्र व तक्रार देण्यामध्ये या वकिलाचा खूप मोठा हातभार व हिस्सेदारी आहे या दोघांचे सुद्धा कॉल डिटेल्स तपासली पाहिजे व यांनी दिलेल्या मराठवाड्यातील सर्व कार्यालयांमध्ये यांच्या तक्रारी किती आहेत यांचे प्रकरण किती सुरू आहेत याबाबत व यांनी बनावट कागदपत्र बनवल्या प्रकरणी व न्यायालयाची फसवणूक केल्याप्रकरणी यांच्याविरुद्ध लवकरच 420 अंतर्गत लवकरच गुन्हा दाखल होण्याचे संकेत आहेत या सर्व प्रकरणाची तक्रार इंजिनिअर सादिक इनामदार भ्रष्टाचार निर्मूलन समिती अध्यक्ष यांनी पुराव्यानिशी दिली आहे. त्यांच्याकडे सर्व पुरावे आहेत ते तक्रारदार आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा