बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच; नागरिकांनी सतर्कता बाळगावी
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच; नागरिकांनी सतर्कता बाळगावी
जिल्हा प्रशासनाकडून दक्षतेसह मार्गदर्शक सूचना जाहीर
बीड (एस.एम.न्युज़) - सद्यस्थितीत मान्सून सक्रिय असून बीड जिल्ह्यात ठिकठिकाणी मुसळधार पावसामुळे नद्या, नाले, ओढे व पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह सुरू आहे. परिणामी अनेक ठिकाणी पुलावरून पाणी वाहत असून नागरिकांकडून निष्काळजीपणामुळे अपघातांच्या घटना घडत आहेत. सदर परिस्थितीचा विचार करून जिल्हा प्रशासनामार्फत सर्व नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले असून दक्षतेसह मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत.
जिल्हा प्रशासनाने नागरिकांसाठी दक्षतेसह घ्यायच्या मार्गदर्शक सूचना पुढील प्रमाणे - 1. मुसळधार पाऊस सुरू असतांना अनावश्यक प्रवास टाळावा. 2. पुराचे पाणी पुलावरून वाहत असल्यास पूल ओलांडू नये. पुराच्या पाण्यात पोहण्याचा प्रयत्न करू नये. पाण्याच्या खोलीचा अंदाज नसेल तर पाण्यात जाऊ नये. 3. पुलावरून किंवा नाल्यांवरून पाणी वाहत असल्यास पूर पाहण्यासाठी नागरीकांनी तेथे गर्दी करु नये. तसेच नदीकाठ, ओढ्याकाठ किंवा धोकादायक ठिकाणी सेल्फी / फोटो काढण्याचा मोह टाळावा. 4. नदीकाठच्या गावातील नागरिकांनी दक्ष रहावे, नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्यास नदीपात्रापासून दूर जावे. 5. पावसाच्या वेळी मुलांना नाल्याजवळ, नदीकाठी किंवा धरण परिसरात जाण्यास परवानगी देऊ नये. 6. धरण क्षेत्र, बंधारे व जलाशय परिसरात पाण्याचा विसर्ग होवू शकतो, त्यामुळे त्या ठिकाणी गर्दी करणे टाळावे. 7. वीज पडत असल्यास झाडाखाली किंवा मोकळ्या जागेत थांबू नये. पुराच्या वेळी पाळीव प्राण्यांना बांधून ठेवू नये. सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. 8. ग्रामपंचायत, पोलीस पाटील, तलाठी किंवा स्थानिक प्रशासनाकडून मिळणाऱ्या सूचनांचे पालन करावे. 9. पावसामुळे घरात पाणी शिरण्याची शक्यता असल्यास वीजपुरवठा बंद करून सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. तसेच जमिनीखालून जाणाऱ्या विद्युत तारांपासून सावध राहावे. 10. दुषित पाणी पिऊ नये, पिण्याचे पाणी उकळून प्यावे व जेवणाआधी हात स्वच्छ धुवून घ्यावे. 11. पूर ओसरल्यानंतर परिसर स्वच्छ करण्यासाठी प्रशासनास सहाय्य करावे व परिसर स्वच्छ ठेवावा. रोगराई पसरू नये याकरिता आरोग्य विषयक खबरदारी घ्यावी. 12. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी (1077) त्वरित संपर्क साधावा. नागरिकांनी निष्काळजीपणा टाळून सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे. जिल्हा प्रशासन सर्वतोपरी दक्ष आहे, मात्र आपत्ती टाळण्यासाठी नागरिकांचे सहकार्य व सतर्कता अत्यावश्यक आहे. असे जिल्हा प्रशासनाकडून निवासी उपजिल्हाधिकारी तथा, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, बीड यांनी कळविले आहे.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा