पोलीस जमादार गायक राजेश राजगुरेंनी रसिक श्रोत्यांची मने जिंकली
पोलीस जमादार गायक राजेश राजगुरेंनी रसिक श्रोत्यांची मने जिंकली
महाराष्ट्रातील गायक, कलाकारांना चित्रपट सृष्टीत संधी मिळायला हवी - एस.एम.युसूफ़
बीड (एस.एम.न्युज़) - आपल्या महाराष्ट्रात कलाकारांची फार मोठी खाण आहे. मग ती अभिनय क्षेत्रात असो की गीत संगीत क्षेत्रात. प्रश्न आहे तो फक्त योग्य वेळी, योग्य संधी व व्यासपीठ मिळण्याचा, ते मिळाले पाहिजे. गायक आणि कलाकारांना आपल्यातील गुण दाखविण्याची सर्वात जास्त संधी मिळते ती चित्रपटसृष्टीत. आपल्या महाराष्ट्रातील मराठमोळ्या गायक आणि कलाकारांना ती मिळाली पाहिजे, असे मत एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी व्यक्त केले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून विदर्भाचे किशोर कुमार म्हणून गायन क्षेत्र आणि युट्युब वर गाजत असलेले बुलढाणा जिल्ह्यातील पोलीस जमादार गायक राजेश राजगुरे यांना नुकतेच नाशिक जिल्ह्यातील परशुराम सायखेडकर नाट्यगृह, शालिमार, नाशिक येथे रविवार दिनांक २४ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजता घेण्यात आलेल्या सदाबहार गीत संगीत कार्यक्रमात आयोजकांकडून मानाने बोलविण्यात आले होते. यावेळी त्यांनी दिवंगत किशोर कुमार यांचे "सारा जमाना, हसीनों का दिवाना" हे गीत गाऊन रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून टाकले. त्यांचे हे गाणे पूर्ण झाल्यानंतर रसिकांनी टाळ्या आणि शिट्ट्यांनी संपूर्ण नाट्यगृह अक्षरशः डोक्यावर घेतले होते. हे पाहता महाराष्ट्रातील कलाकार आणि गायकांना योग्य वेळी चित्रपटसृष्टीत संधी मिळावी असे मत एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी व्यक्त केले आहे.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा