Breaking News

ऐतिहासिक कारंजा टॉवरच्या परिपूर्णतेसाठी आवश्यक कामे कोण कोणती? वाचा

ऐतिहासिक कारंजा टॉवरच्या परिपूर्णतेसाठी आवश्यक कामे कोण कोणती? वाचा

बीड (एस.एम.न्युज़) - शहराची ऐतिहासिक ओळख असलेल्या कारंजा टॉवरच्या परिपूर्ण नूतनीकरणासाठी प्रशासकीय स्तरावर कामे करण्यात यावी याकरिता एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक रमेशराव गंगाधरे यांनी जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी, तहसीलदार आणि पोलीस अधीक्षक यांना कार्य करणे आवश्यक असलेल्या मुद्द्यांच्या यादीचे निवेदन दिले आहे.


याविषयी दिलेल्या निवेदनात नमूद केलेली कामे खालील प्रमाणे आहे 
१) कारंजा टॉवरचे तुटलेले दार बदलून नवीन दार लावणे
२) बंद पडलेल्या घड्याळी सुरू करणे
३) इमारतीला आतून बाहेरून रंगरंगोटी करणे
४) इमारतीवर चारही बाजूने प्रकाश टाकणारे हाय मास्ट दिवे लावणे
५) जवळील दोन्ही झाडांच्या टॉवर ला चिटकलेल्या फांद्या छाटणे
६) कारंजा टॉवरच्या चारही बाजूने लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करणे
७) इमारती समोर तसेच या परिसरात डिजिटल होर्डिंग लावण्यास कायमस्वरूपी कडक बंदी घालणे
८) कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक प्रतिबंधक सक्तीच्या कारवाया करणे
९) इमारतीच्या पश्चिम आणि उत्तर बाजूच्या रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करणे
१०) काँक्रिटीकरण झाल्यावर पश्चिम व उत्तर बाजूस दक्षिण बाजू सारखे सिमेंटचे बाकडे ठेवणे
११) कारंजा टॉवरची देखभाल आणि सुरक्षेकरिता बीड नगर परिषदेचा प्रत्येकी किमान एक-एक कर्मचारी दिवस-रात्र कायमस्वरूपी नियुक्त करणे
आदी कामे प्रशासनाने युद्ध पातळीवर करणे आवश्यक असल्याचे नमूद केले आहे. तसेच नागरिकांच्या पुढाकारातून सिमेंट चे १० बाकडे कारंजा टॉवर परिसरात ठेवण्यात आले आहे. पाण्याचे फवारे उडविणारी मोटार लावण्यात आली आहे. पाण्याच्या फवाऱ्यासाठी रंगबिरंगी लाईटस् लावण्याचे कार्य कार्यान्वित करण्यात आले आहे. यामुळे इमारत व परिसर आकर्षक दिसू लागल्याचे ही म्हटले आहे.

============================

*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत