Breaking News

रमज़ानसाठी निघालेले ढीग भर पत्रक ठरले वांझोटे


रमज़ानसाठी निघालेले ढीग भर पत्रक ठरले वांझोटे

वार्ड क्रमांक १८ मधील नागरिक भोगताहेत नरक यातना

बीड (एस.एम.न्युज़) - शहरातील वार्ड क्रमांक १८ मधील नागरिकांना जीवन जगताना अक्षरश: नरक यातना भोगाव्या लागत आहेत. येथील मोठा नाला तुडुंब भरल्याने त्याचे गलिच्छ पाणी रस्त्यांवरून वाहत असून नाल्याच्या गलिच्छ पाण्यापासून वाचण्यासाठी लोकांना रस्त्यांवर विटा ठेवून मार्गक्रमण करावे लागत आहे. विशेष म्हणजे रमज़ान महिन्यात मुस्लिम बांधवांनी विविध समस्यांबाबत काढलेल्या पत्रकांचा काही एक उपयोग झाला नसल्याचेही यावरून दिसले. रमज़ानसाठी काढलेली पत्रके दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वांझोटीच ठरल्याचे दिसून आले. असे एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी म्हटले आहे.
बीड शहरातील सुप्रसिद्ध सुफी संत हज़रत शहिंशहावली दर्गा शेजारी असलेल्या उमर मस्जिद आणि मुहम्मदीया मस्जिद या दोन्ही मस्जिद मध्ये जाऊन नमाज़ पठण करणाऱ्या नमाज़ींना नाल्याच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात असुविधा व त्रास होत आहे. रस्त्यावरून वाहणाऱ्या गलिच्छ पाण्यात पाय जाऊ नये, गलिच्छ पाण्याचे शिंतोडे कपड्यांवर उडू नये याची दक्षता घेत मुस्लीम बांधवांना ये-जा करावी लागत आहे. सध्या इस्लाम धर्माचा पवित्र रमज़ान महिना सुरू आहे. ईद अवघ्या तीन दिवसांवर आली आहे. परंतु याचे कुठलेही सोयरसुतक बीड नगरपरिषद, मुख्याधिकारी किंवा प्रशासनाला असल्याचे दिसत नसल्याने येथील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. याकडे बीड नगरपरिषद प्रशासन आणि मुख्याधिकारी लक्ष देतील का? असा प्रश्न या अनुषंगाने उपस्थित होऊ लागला असल्याचे एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी म्हटले आहे.

============================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत