Breaking News

मजबूरी का नाम महात्मा गांधी! करणार काय? सांगणार कुणाला?


मजबूरी का नाम महात्मा गांधी!

करणार काय? सांगणार कुणाला?

दिनांक ०२ मार्च २०२५ पासून इस्लाम धर्मातील सर्वात पवित्र महिना रमज़ान सुरू झाला होता. आणि काल दिनांक ३० मार्च २०२५ रोजी मग़रीब नमाज़ नंतर थोड्यावेळाने चंद्र दिसल्याचे जाहीर झाल्यानंतर आज दिनांक ३१ मार्च २०२५ रोजी रमज़ान ईद मुस्लिम बांधव स्वधर्मीयांसह इतर सर्व जाती धर्मातील बंधू-भगिनींसोबत मिळून साजरी करीत आहे.

परंतु तत्पूर्वी रमज़ान ईद ची ओळख असलेले शीरखुर्मा हे खाद्य पेय बनविण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेले दूध लागते ते घेण्यासाठी मुस्लिम बंधू-भगिनी जेव्हा बाजारात येतात, तेव्हा ठीकठिकाणी आपापले मोठमोठे टँकर्स घेऊन दूध विक्रेते दूध विकत होते.

काही वर्षांपूर्वी शासन चालवीत असलेल्या शासकीय दूध डेअऱ्यांमधून दुधाचे टँकर यायचे. त्या दुधाचे दरही सर्वसामान्य गोरगरिबांना परवडेल आणि दैनंदिन जीवन जगत असताना मिळणाऱ्या दुधाच्या दरापेक्षा त्या दुधाचे दर हमखास कमी असायचे. परंतु शासन-प्रशासनाच्या अनास्थेमुळे तसेच योग्य नियोजनाच्या अभावामुळे शासकीय दूध डेअऱ्यांना टाळे लागले आणि मग तिथून सुरू झाल्या खाजगी व्यापाऱ्यांच्या दूध डेअऱ्या.

एरवी उच्चभ्रू आणि काही प्रमाणात मध्यमवर्गीय वगळता सर्वसामान्य गोरगरीब या खाजगी दूध डेअऱ्यांच्या दुधाकडे ढुंकणही पाहत नाही परंतु रमज़ान ईद साजरी करण्यासाठी शीरखुर्मा बनविण्याकरिता दुधाची मागणी वाढते आणि मागणीप्रमाणे दूध उत्पादक असलेल्या शेतकऱ्यांकडून चांगल्या प्रतीचे दूध हवे त्या प्रमाणात मिळत नसल्याने नाविलाजास्तव लोकांना या खाजगी दूध डेअऱ्यांच्या टँकर वाल्यांकडून दूध घ्यावे लागते.

कालही या खाजगी दूध डेअऱ्यांच्या टँकर वाल्यांकडून ठीकठिकाणी लाईनीत उभे राहून लोकांना दूध घ्यावे लागले.

खाजगी डेअऱ्यांवाले याला दूध म्हणत असल्याने घेणाऱ्यांनीही दूध म्हणून ते ६० साठ रुपये प्रति लिटर प्रमाणे विकत घेतले.

आता प्रश्न पडतो की, जेव्हा हे खाजगी दूध डेअऱ्यांवाले लोकांना ६० रुपये प्रति लिटर प्रमाणे जे दूध विकत होते ते खरेच हे शेतकऱ्यांकडून एवढ्या मोठ्या दराने विकत घेतात का? तर याचे उत्तर नाही असेच आहे.

शिवाय एवढ्या महाग दराने घेतलेले दूध कसे आहे तर त्याच्यात ना दुधाचा गंध, ना घट्टपणा, ना त्याच्यावर साय येण्याचा पत्ता, माप घेताना फक्त पाण्याचे बुडबुडे आलेले पाहून हे दूध कमी आणि पांढरे पाणी जास्त असा सगळा प्रकार होता.

या दुधापासून बनविण्यात येणारा शीरखुर्मा एवढा सपक बनतो की, त्याच्यात दुधाची चवच नसते. शीरखुर्मा तयार करताना या दुधात महाग मोलाचा सुकामेवा ज्यात काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड, चारोळी, खारीक, मनूके, खवा, गावरान तूप, खोबरे, साखर अशा अनेक वस्तू टाकून बनविला जातो.

दुधाच्या मानाने या सर्व वस्तूंची किंमत ही अनेक पटींनी जास्त असते. असे असूनही अनेक पट खर्च करून जो शीरखुर्मा बनविला जातो, त्यात मुळात सपक दूध म्हणजेच पांढरे पाणी असते. यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च करून ही शीरखुर्मा बनविणाऱ्यांसह तो ग्रहण करणाऱ्यांनाही मानसिक आणि चवदार समाधान मिळत नाही. मात्र शीरखुर्मा बनविण्याची वर्षानुवर्षांपासून चालत आलेली रीत आणि ईद साजरा करण्याचा आनंद यामुळे मुस्लिम बांधवांना हे निकृष्ट आणि सपक दूध खरेदी करावेच लागते.

जर हे दूध घेतले नाही तर दूध दुभत्याचा व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांकडून सुद्धा दर्जेदार दूध मिळत नाही. यामुळे मुस्लिम बंधू-भगिनींनी खाजगी दुध डेअऱ्यांकडून आलेल्या टॅंकर वाल्यांकडून खरेदी केलेल्या सपक आणि बेचव दुधाला पाहून अनायासे *मजबूरी का नाम महात्मा गांधी* असेच म्हणावे लागते. परंतु हे सगळं सांगणार कुणाला? आणि करणार काय? असे प्रश्न निश्चितपणे या अनुषंगाने उपस्थित होतात. अन् ही अवस्था दिवसेंदिवस शासन प्रत्येक क्षेत्राचे करत असलेल्या खाजगीकरणामुळे होत आहे. याला शासकीय दूध डेअऱ्या बंद करून खाजगी दूध डेअऱ्या सुरू करण्याचे धोरणही अपवाद नाही.

लेखन - *एस.एम.युसुफ़* (मुक्त पत्रकार)
आसेफ़नगर, बीड
संपर्क - 9021 02 3121
============================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत