महावितरण कंपनी ॲक्शन मोडमध्ये; ५३६ ग्राहकांचा विद्युत पुरवठा तोडला
महावितरण कंपनी ॲक्शन मोडमध्ये; ५३६ ग्राहकांचा विद्युत पुरवठा तोडला
कंपनीसमोर मार्च अखेर पर्यंत १६८ कोटी वसुलीचे आव्हान; त्वरीत वीजबील भरण्याचे कंपनीकडून आवाहन
बीड (एस.एम.न्युज़) - महावितरण कंपनीने मार्च महिन्याची व थकीत वीजबिलांची वसुली मोहीम हाती घेतली असून उन्हाची तिव्रताही दिवसेंदिवस वाढत आहे. मार्चच्या रखरखत्या उन्हाळ्यात गारवा हवा असेल तर वीजग्राहकांनी आपले थकीत वीजबील त्वरीत भरावे अशी आर्त हाक महावितरणने जिल्ह्यातील वीजग्राहकांना घातली आहे. गेल्या ११ दिवसात ३४ टक्केच वसुली झाल्याने उर्वरीत २० दिवसात महावितरणला १५७ कोटी ७ लाख रूपयांची थकबाकी वसुली करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे वीजग्राहकांनी आपल्या थकीत विजबीलांचा भरणा करून सहकार्य करावे अन्यथा नाईलाजास्तव वीजपुरवठा खंडीत करण्याची कारवाई करावी लागेल असे आवाहनही महावितरण कंपनीने केले आहे.
महावितरणच्या बीड मंडळासाठी वरिष्ठ कार्यालयाने लघूदाब वर्गवारीतील घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांकडील विजबील वसुलीसाठी मार्च महिन्याचे चालू बिलाचे ३२ कोटी ५ लाख व थकबाकीचे १३६ कोटी ४ लाख असे एकत्रीत १६८ कोटी ८ लाख रूपयांचे लक्ष्य निर्धारीत केले आहे. या लक्ष्याचा पाठलाग करत मागील ११ दिवसात केवळ ११ कोटी १ लाख रूपयांची विजबील वसुली झालेली आहे. हे प्रमाण खूपच कमी असून येणाऱ्या २० दिवसात उर्वरीत १५७ कोटी ७ लाख रूपयांची वसुली होण्यासाठी महावितरण कंपनी करिता तारेवरची कसरत ठरणार आहे. वसुलीसाठी मंडळातील सर्व अधिकारी, कर्मचारी दारोदार फिरत आहेत, मात्र जिल्ह्यातील घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीतील विजग्राहकांकडून फारसा सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत नाही. त्यामुळे भर उन्हाळ्यात विद्युत पुरवठा खंडीत करण्याशिवाय महावितरण कंपनी समोर दुसरा पर्याय उरलेला नाही. वीजबील न भरल्यामुळे गेल्या ११ दिवसात ४९५ विजग्राहकांचा तात्पुरत्या स्वरूपात विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला आहे तर ४५ विजग्राहकांचा विद्युत पुरवठा कायमस्वरूपी खंडीत करण्यात आला आहे.
बीड मंडळा अंतर्गत येणाऱ्या लघुदाब वर्गवारीतील १ लाख २७ हजार १७३ घरगुती ग्राहकांकडे ११५ कोटी ४८ लाख थकीत आहेत. व्यावसायिक वर्गवारीतील १० हजार ४९४ विजग्राहकांकडे १० कोटी ६९ लाखांची थकबाकी आहे तर औद्योगिक वर्गवारीतील २ हजार ८०० ग्राहकांकडे २१ कोटी ८४ लाख थकीत असून इतर वर्गवारीत मोडणाऱ्या ग्राहकांकडे ६ कोटी ७ लाख रूपयांची थकबाकी आहे. काल पर्यंत झालेल्या वसुली मोहिमेत ११ कोटी १ लाख रूपयांची वसुली झालेली आहे. येणाऱ्या दिवसातील सार्वजनिक सुट्ट्यांचा कालावधी पाहता जास्तीत जास्त वसुली होण्याकरिता महावितरण कंपनीचे सर्व विजबील भरणा केंद्र सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तरी विजग्राहकांनी त्वरीत विजबीलाचा भरणा करावा असे आवाहन महावितरण कंपनीने केले आहे.
==============================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा