*अपरिपक्व "राष्ट्रीय" नेत्या.....*
गेली दोन दिवस भाजप नेत्या (वडिलांच्या कर्तृत्वामुळे) पंकजा मुंडे यांची विधाने पहिली,आणि परत एकदा सिद्ध झाले की त्या अपरिपक्व नेत्या आहेत,अर्थात त्या नेत्या होऊ शकतात का हाच मुळात संशोधनाचा भाग आहेच.आपण यावर आता बोलूयात नको.मात्र फक्त मागे गोपीनाथ मुंडे हे बिरुद आहे म्हणून आज हे वलय दिसत आहे एवढाच सरळ सरळ अर्थ त्यांच्या राजकीय कर्तृत्वाचा व आजपर्यंतच्या राजकीय प्रवासाचा काढला तर तो मुळीच चूक होता कामा नये.पंकजा मुंडे या कायम आपल्या विधानामुळे मागे राहिल्या, अर्थात परिपक्वता नसेल,आणि राजकारणात काय बोलावे यापेक्षा काय बोलू नये याला आजच्या घातक राजकारणात अधिक महत्त्व आलेले असताना पंकजा मुंडे यांना तेच कळत नसेल तर त्या नेत्या आणि त्या देखील राष्ट्रीय नेत्या होऊ शकतात का किंबहूना ती पात्रता आहे का हाच खरा प्रश्न आहे.आणि आज पंकजा मुंडे यांना मी राष्ट्रीय नेता आहे हे जर सांगावे लागत असेल तर यापेक्षा मोठे दुर्दैव कांहीच नाही व येथेच पंकजा मुंडे यांची अपरिपक्वता स्पष्ट होते.अर्थात 2019 ची विधानसभा व 2024 ची लोकसभा असे सलग दोन पराभव होम ग्राउंडवर पंकजा मुंडे यांचे झाले असतील तर राष्ट्र किंवा राष्ट्रीय नेत्या या बिरुदाची व्याख्या नेमकी पंकजा मुंडे यांच्या लेखी काय आहे याचा विचार पंकजा मुंडे यांनी करण्याची गरज आहे.अर्थात 2009 ला ज्यावेळी पंकजा मुंडे या पहिली वेळ आमदार झाल्या त्या गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे. तर 2014 ला गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाल्यानंतर जी विधानसभा निवडणुक झाली, त्या निवडणूकीत पंकजा मुंडे यांचा जवळपास 25 हजार 895 एवढ्या कमी फरकाने विजय झाला होता. मुळात तो विजय फार मोठ्या फरकाने अपेक्षित असताना जो विजय त्यांचा झाला तो विजय नसून पराभव होता.बाकी 2014 पासून आजतागायत परळी मतदारसंघातील एक देखील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीत पंकजा मुंडे यांना आपला विजय नोंद करता आलेला नाही,एकेकाळी आशिया खंडात ज्या वैद्यनाथ साखर कारखान्याचे नाव गाजले, त्या कारखान्याची अवस्था मुंडेच्या पश्चात जी झाली ती अवस्था राष्ट्रीय नेत्या किंवा लोकनेत्याला शोभणारी आहे का याचे आत्मचिंतन पंकजा मुंडे यांनी आपला बिनकामाचा अहंकार बाजूला करून करण्याची गरज आहे.आणि असे राष्ट्रीय नेते होऊ शकतात हे भाजपचे दुर्दैव की अन्य कोणाचे हे ज्याचे त्याने पाहावे.असो,काल आणि आज त्यांची अगदी मजेशीर विधाने कानावर पडली.सकाळ समूहाला दिलेल्या मुलाखतीत पंकजा मुंडे यांनी असे विधान केले की सुरेश धस हे धनंजय मुंडे यांना कॅमेरे घेऊन का भेटले नाहीत.आता याठिकाणी आज धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात खूप प्रेम झाले आहे असे समोर दाखवले तरी जात आहे.2009 ला याच पंकजा मुंडे यांच्यामुळे धनंजय मुंडे यांचा राजकीय श्रीगणेशा होता होता राहिला होता, आणि पुढे धनंजय मुंडे यांनी काय काय विधाने गोपीनाथ मुंडे यांना सोडल्यानंतर केली हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलंय.असो तो मुद्दा आज नाही.मुद्दा आहे धनंजय मुंडे यांची भेट सुरेश धस यांनी कॅमेरे घेऊन का घेतली नाही.अर्थात धनंजय मुंडे यांनी सुरेश धस आपल्याला भेटणार आहेत हे पंकजा मुंडे यांना सांगितले असेल की नाही हा भाग वेगळा.मात्र जर सांगितले असेल तर गनिमीकावा करत त्याच दिवशी मुंडे भावंडांनी सुरेश धस यांना कॅमेऱ्या समोर उघडे पाडायचे होते.बरे तेवढे कशाला,मुंडे - धस भेटीत नेमके काय झाले हे फक्त धस आजपर्यंत बोलले आहेत.धनंजय मुंडे अद्याप यावर चकार शब्द बोलले नाहीत,मग आपल्या बंधुकडून पंकजा मुंडे यांनी भेटीचे राज उघडले तर ते आणखीन धस यांना अडचणीत आणण्यासाठी प्रभावी असू शकले असते.अर्थात प्रश्न पुन्हा तोच,धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांना किती महत्त्व देतात आणि दुसरा राष्ट्रीय नेत्या परिपक्व आहेत का ? आज महायुतीत मुंडे बहीण भाऊ नाईलाजाने का असेनात एकत्र आले तरी.शिवाय जिल्ह्याच्या राजकरणात एकतर्फी मांड कोणाची राहावी ही किनार देखील आहेच.अर्थात धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडेंना सोडले नाही तर पंकजा मुंडे यांना धनंजय मुंडे हे चालत चालत साफ करु शकतात.याच मुलाखतीमध्ये पंकजा मुंडे यांनी आपला संबंध नसताना आपली बदनामी केली जातेय,आता धस ज्याअर्थी एवढे उघड बोलत आहेत त्याअर्थी त्यांना कोणाचे पाठबळ आहे हे वेगळे सांगायला नको.फरक फक्त एवढाच आहे की आज धनंजय मुंडे यांचे स्टार चांगले नाहीत म्हणून ते पाठबळ आज धसांच्या मागे आहे.मुळात बीड जिल्ह्यातील घडलेली घटना आहे आणि त्याच्याशी माझा संबंध नाही हे परत अपरिपक्वतेचे लक्षण.आणि जर संबंध नसेल तर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याविषयी बोलण्याची गरज आणि ते देखील फार पूर्वी व्हायला हवा होता,किंबहुना शपथच नको व्हायला हवी होती याची तरी गरज काय होती हा मूळ प्रश्न आहे.हे काय कमी होते की काय आज परत माध्यमासमोर बोलताना पंकजा मुंडे यांनी हम जंहा खडे होते है लाईन वंही से शूरु होती है याप्रमाणे सुरेश धस यांना मी मदत केली नसती तर त्यांना 75 हजारांचे मताधिक्य विधानसभा निवडणुकीत मिळाले असते का असे सांगत आष्टी मतदारसंघात आपला प्रभाव आहे हे त्यांनी अधोरेखित केले ,व सोबतच लोकसभा निवडणुकीत मला मागील निवडणुकीच्या तुलनेत आष्टी विधानसभा मतदारसंघातुन कमी मताधिक्य मिळाले याचा अर्थ धस यांनी माझे काम केले नाही असा घेऊ का हे देखील त्यांनी स्पष्ट केले.याठिकाणी दोन प्रश्न उपस्थित होतात, पहिला आष्टी मतदारसंघात सुरेश धस यांच्या तुलनेत पंकजा मुंडे यांचा राजकीय प्रभाव अधिक आहे का ? तर त्याचे उत्तर नाही असेच आहे.जो कांही प्रभाव आहे तो वंजारी मतापूरता आहे,आणि त्याचे देखील विभाजन करावे लागेल.आणि सुरेश धस हे 1999 पासून आमदार आहेत,त्यामुळे धस यांची राजकारणाची पद्धत पाहता,म्हणजे धस यांनी गोपीनाथ मुंडे यांची सत्ता बीड जिल्हा परिषदेत उधळून लावत आपली सत्ता आणली होती हा इतिहास विसरून चालणार नाही.त्यामुळे पंकजा मुंडे यांनी आपल्यामुळे धस यांचा विजय झाला किंवा 75 हजारांचे मताधिक्य मिळाले असे म्हणणे परत एक अपरिपक्वतेचे उदाहरण.याउलट जे धस यांनी आरोप केले,की माझ्या विरोधात काम केले,तर आष्टी मतदारसंघात वंजारी समाजाच्या नेत्यांना विरोधात कामाला लावले तर यात तथ्य नाही,आणि पंकजा मुंडे हे भाजपच्या विरोधात काम करत नाही असे म्हणणे म्हणजे शुद्ब आणि धादांत खोटेपणा आहे.म्हणजे आम्हाला आज देखील आठवतं की लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात धस तर मराठा आहेत,त्यांच्या विरोधात पंकजा मुंडे यांनी केलेले काम एक वेळ समजू शकू,पण रमेश कराड हे वंजारी असताना 2014 ला रमेश कराड यांच्या पराभवाचा पाया कोणी रचला हे लोक विसरलेले नाहीत.एवढे कशाला 2019 ला त्याच रमेश कराड यांचा बळी देत लातूर ग्रामिणची जागा शिवसेनेला सोडल्यानंतर रमेश कराड समर्थक आणि राजेश कराड हे परळीला घरी आल्यानंतर त्यांना न भेटता पळून जाणे हे कशाचे लक्षण होते.तर धीरज देशमुख यांची वाट पंकजा मुंडे यांना मोकळी करायची होती.अर्थात 2014 पूर्वी गोपीनाथ मुंडे यांनी देखील लातूर जिल्ह्यात भाजपचा सौदाच केलाय,त्याचा तर काळाकुट्ट इतिहास आहे,पण तो विषय आज नाहीये.त्यामुळे मुंडे परिवाराच्या रक्तातच बेईमानी आणि बंडखोरी आहे हे मुंडे यांच्या राजकरणाचा स्थायी भाव आहे हे मुळात समजून घेतले असता पंकजा मुंडे यांनी विरोधात काम केले नाही किंवा करू शकत नाही असे मुळीच नाही.अर्थात प्रश्न पुन्हा तोच प्रभाव आहे का ? तर तो फक्त जातीय परिपेक्षापुरता आहे हे मान्य करावे लागेल.बाकी लोकनेत्या आणि राष्ट्रीय नेत्या हे फुकटची फुशारकी मारण्यासाठी लावून घेतलेले बिरुदे आहेत किंबहुना त्या स्वयंघोषित लोकनेत्या आहेत असा सरळ सरळ अर्थ होतो.याच विधानात बोलताना पंकजा मुंडे यांनी लोकसभा निवडणुकीत मला आष्टी विधानसभा मतदारसंघात गतवेळी पेक्ष्या कमी मताधिक्य मिळाले असे देखील स्पष्ट केले.तर मागिल वेळी उमेदवार या प्रीतम मुंडे होत्या,पंकजा मुंडे नाही,आणि पंकजा मुंडे म्हणजे गोपीनाथ मुंडे नाही हे प्रथम आपल्या डोक्यात पंकजा मुंडे यांनी फिट्ट बसवून घेण्याची गरज आहे.त्यामुळे 2019 च्या तुलनेत 2024 च्या लोकसभा निवडणुकीत जो फटका भाजपला मराठा आरक्षणाचा बसला त्या परिपेक्षात पंकजा मुंडे यांना आष्टी विधानसभा मतदारसंघात मिळालेले मताधिक्य हाच मुळात मोठा विषय आहे.त्यामुळे आज पंकजा मुंडेंनी इतरांना समज द्यावी अशी मागणी करत असताना त्यांनी स्वतःची समज आणि त्या समजची समाजात किती समज आहे हे आत्मचिंतन केले तर समज देण्याची वेळच येणार नाही हे मात्र नक्की.
लेखन - *जावेद शेख*
संपादक - बातमी मागची बातमी,लातूर.
संपर्क - *9158950000*
==============================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा