Breaking News

अबू असीम आझमी यांचे निलंबन रद्द करून झेड प्लस सुरक्षा द्या - नवीदोद्दीन सिद्दिकी


अबू असीम आझमी यांचे निलंबन रद्द करून झेड प्लस सुरक्षा द्या

समाजवादी पक्षाचे माजलगाव तालुकाध्यक्ष नवीदोद्दीन सिद्दिकी यांची मागणी

माजलगाव (एस.एम.न्युज़) - समाजवादी पार्टीचे आमदार व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबु आसिम आझमी यांचे निलंबन रद्द करून झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी पक्षाचे माजलगाव तालुकाध्यक्ष नवीदोद्दीन सिद्दिकी यांनी तहसीलदार यांच्यामार्फत महाराष्ट्राचे राज्यपाल यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.

याविषयी पाठविलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, समाजवादी पार्टी चे आमदार व समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबु आसिम आझमी यांना महाराष्ट्र विधानसभेच्या चालु अर्थसंकल्पीय अधिवेशनात औरंगजेब यांचे उदात्तीकरण केल्याच्या खोट्या आरोपावरून असंवैधानिकरित्या निलंबन करण्यात आले आहे. त्यांच्यावर छत्रपती संभाजी महाराज यांचे अवमान केल्याचा ठपका ठेवून मनमानी पद्धतीने त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. अबु आसिम आझमी नेहमी देशहित पाहणारे व गोर-गरीबांना मदत करणारे आमदार आहेत. नेहमी सत्त्याच्या बाजुने उभे राहणारे लोकप्रतिनिधी असून त्यांच्यावर खोटे आरोप ठेवून त्यांना निलंबित करणे अयोग्य आहे.

तसेच वरील प्रकरणी त्यांना जिवे ठार मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत, म्हणून त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची गरज आहे. म्हणून माजलगाव समाजवादी पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते या नात्याने माजलगाव तहसीलदार यांच्यामार्फत महाराष्ट्राचे राज्यपाल यांना पाठवलेल्या निवेदनातून लवकरात लवकर अबु आसिम आझमी यांचे निलंबन रद्द करून त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी. अशी मागणी समाजवादी पार्टीचे माजलगाव तालुकाध्यक्ष नवीदोद्दीन सिद्दिकी आणि कार्यकर्त्यांनी केली आहे.

==============================

*एस.एम.न्युज़ च्या सेवा*

१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.

२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.

३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.

४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार) 

आसेफ़नगर, बीड.

संपर्क - *9021 02 3121*

*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*

दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत

शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत

*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत