नवीरा बागवान चा पहिला रोजा पूर्ण
नवीरा बागवान चा पहिला रोजा पूर्ण
बीड (एस.एम.न्युज़) - शहरातील कागज़ी दरवाजा परिसरात राहणारे नवीद फिरोज बागवान यांची ७ वर्षीय कन्या नवीरा हिने आपल्या आयुष्यातील पहिला रोजा पूर्ण केला याबद्दल तिचे अभिनंदन होत आहे.
इस्लाम धर्मातील पवित्र रमजान महिना सुरू होऊन आतापर्यंत १३ रोजे पूर्ण झाले आहेत. सुरुवातीला जवळपास १० रोजेपर्यंत वातावरणात अचानक आलेल्या थंडीच्या लाटेमुळे रोजेदारांना उन्हाची दाहकता जास्त जाणवली नाही. ११व्या रोज्यापासून थंडीची लाट ओसरली आहे. आता सूर्याने आग ओकायला सुरुवात केल्याने सर्वसामान्यांसह रोजेदारांच्या अंगाचीही लाहीलाही होत आहे. असे असतानाही या उष्ण आणि तप्त वातावरणात सुद्धा मुस्लिम समाजातील लहान-लहान मुले-मुली रमजान महिन्याचे रोजे ठेवत आहे. अशाच प्रकारे नवीरा बागवान या ७ वर्षीय मुलीने आपल्या आयुष्यातील पहिला रोजा पूर्ण केला. यामुळे तिचे दादा-दादी, अम्मी-अब्बू, चाचा-चाची आणि सर्व बहिण-भावांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
==============================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा