Breaking News

नगर पालिकेच्या नावाने जो बोंबलणार नाही, तो.. बो बो बो


नगर पालिकेच्या नावाने जो बोंबलणार नाही, तो.. बो बो बो

आता शिमगा आला. परंतु नगरपालिकेचा प्रत्येक महिनाच शिमग्याचा असतो. कितीही नगरपालिके विषयी निवेदने केले, कोणी मोर्चे काढले तर कोणी सर्व मीडियामध्ये बातमी दिली. तरीही नगरपालिकेला काहीही फरक पडत नाही. इतके निडर झालेली नगरपालिकेचे अधिकारी. सामान्य लोकांच्या डोक्याला ताप झाला आहे. बीड शहरात संपूर्ण शहरभर जागोजागी कचऱ्याचे ढिगारे, रस्त्यावरील घाण हे सर्व लोकांच्या डोक्याला ताप झाला आहे. या सर्व कचरा आणि घाणी मुळे लोकांमध्ये वाढती रोगराई याला सामोरे जावे लागत आहे. वेळोवेळी नगर पालिका प्रशासन यांना या संदर्भात कळवून सुद्धा काही फरक पडलेला नाही. कचऱ्याची विल्हेवाट लावली नाही आणि जागोजागी कचराकुंडी दिली नाही. नगरपालिकेच्या नावानं फक्त शिमग्यालाच नाही तर प्रत्येक सणाला बोंबलावचं लागते. नगर पालिकेला आणि प्रशासनाला या संदर्भात जाग येणार की नाही हा प्रश्न सामान्य माणसाच्या मनात निर्माण झाला आहे. बीड शहर म्हटले की, बाहेर गावी असलेल्या माणसाला बीडला यावेसे वाटत नाही. जागोजागी कचऱ्याचे ढीग पाहूनच समजते की शहर कसे आहे. आतील रस्ते सोडा पण मुख्य रस्त्यांवर साधी लाईट व्यवस्था नाही.
बीड शहरातील माणसे असे असंख्य प्रश्नांनी परेशान आहेत. कचरा, रस्त्यावरील लाईट, 10 दिवसाला येणारे पाणी, रस्त्यात येणारे बॅनर, घंटा गाडी बंद पडलेली. शहरातील नाले सफाई नाही. कचराकुंडी नाही. या सर्व अडचणीनां रोज सामोरे जावे लागते. सामान्य जनतेला असे  वाटत आहे की, आता निवेदन छोटी आंदोलने करण्याची वेळ संपलेली आहे. आता गरज आहे फक्त आक्रमकतेची. कारण रोगराईला सामोरे जाण्यापेक्षा काहीतरी ठोस पाऊले उचलावीच लागतील. हे प्रश्न फक्त एका भागाचे नसून संपूर्ण बीड शहराचे आहे. प्रशासने झोपली असतील तर वेळ आली आहे त्यांना जागे करायची. या उपरोक्त प्रसासनाने हि दखल घेऊन प्रत्यक्षात काही कृती न केल्यास एक वेगळे आंदोलन करावे लागेल हे नक्की आहे. अजून एकदा प्रशासनाला विनंती आहे सर्व प्रश्न लवकरात लवकर सोडवावेत. अन्यथा नाईलाजाने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभारावे लागेल.
लेखन - *रुपाली देशपांडे*
संंपर्क - *8888955539*
==============================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत