*रमज़ान महिना, सायमा आणि पुण्य*
*रमज़ान महिना, सायमा आणि पुण्य*
सध्या इस्लाम धर्मातील सर्वात पवित्र समजला जाणारा रमज़ान महिना सुरू आहे. या महिन्यात पुण्य कमविण्याची संधी सायमा च्या रूपात चालून आली आहे. तेव्हा लोकहो, सायमाला आर्थिक मदत करून पुण्य कमवा. सध्या सायमावर उपचार सुरू असून ती अडखळत का होईना वाकर च्या साह्याने एक-एक पाऊल पुढे टाकत आहे. तिला तिच्या पायावर उभी राहून धावू शकणारी करण्याकरिता उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. तिच्यावर उपचारासाठी आर्थिक मदत देऊ इच्छिणाऱ्यांनी 8888455282 सय्यद शफाऊद्दीन असहाबूद्दीन यांच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर मदत पाठवावी किंवा लेखासोबत दिलेल्या क्यू आर कोड वर सुद्धा मदत पाठविता येईल.
बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे जवळपास गेल्या तेरा वर्षांपासून शेतात शेतगडी म्हणून अहोरात्र कष्ट घेणारे मिर्झा हुसेन बेग हे सपत्नीक शेतात राब-राब राबतात. संपूर्ण कुटुंबाचा डोलारा बेग पती-पत्नीच्या खांद्यावर असल्याने शेतगडी म्हणून जे काही उत्पन्न मिळते त्यातूनच आपल्या पोटच्या गोळ्यांचे पालन पोषण आणि शिक्षण करावे लागत आहे. अशा या शेतमजूर जोडीला असलेल्या मुला-मुलींपैकी शेतात आई-वडील काम करत असताना नऊ वर्षांपूर्वी मुलगी सायमा ही बैलगाडी च्या सावलीत बैलगाडीखाली झोपली होती. तेव्हा तिची लहान भावंडे बैलगाडीवर खेळत असताना अचानक बैलगाडी उलटी झाली. ती सायमाच्या पाठीवर पडल्याने तिचे पाय कमरेपासून निकामी झाले होते. हुसेन बेग यांची आर्थिक स्थिती बरी नसल्याने त्यांनी करता येईल तेवढे उपचार सायमावर करून घेतले. नंतर जवळ पैसे नसल्याने पुढील उपचार त्यांना करता आले नाही. यामुळे सायमा ही घरी नऊ वर्षापासून अंथरुणावर पडून होती.
यामुळे एवढ्या मोठ्या कालावधीत तिच्या अंगावर अनेक जागी मोठ्या जखमा झाल्या होत्या. जखमा एवढ्या खोल झाल्या की तेथील मास जाऊन अंगावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. एकीकडे बैलगाडीचा आघात पाठीवर झाल्याने पाय निकामी झाले तर दुसरीकडे जखमांनी शरीर पोखरले गेले. सायमाची ही अवस्था काही दिवसांपूर्वी पाटोदा शहरातील किसान मशिनरी स्टोअर्स चे मालक सय्यद शफाउद्दीन यांच्या कानावर आली. त्यांनी उशीर न लावता तात्काळ सायमाच्या घरी धाव घेऊन सर्व परिस्थितीची माहिती घेतली आणि तिला पुणे येथील संचेती हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ भरती केले. तसेच प्रसिद्धी माध्यमातून सायमावर उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज असल्याची बातमी प्रकाशित झाल्यावर समाजातील काही दानशुरांनी आर्थिक मदत केल्याने सायमावर उपचार सुरू झाले आहेत. काही दिवस संचेती हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यानंतर सायमाच्या कमरेपासून खाली पायापर्यंत आवश्यक उपकरणे लावून डॉक्टरांनी तिला वाकरच्या सहाय्याने चालण्याइतपत बरे केले आहे.
चार पावले टाकताना भलेही त्याला खूप त्रास होत आहे, ती अडखळत आहे परंतु नऊ वर्षापासून अंथरुणावर पडून असलेली सायमा नऊ वर्षानंतर स्वतःच्या पायावर उभी तरी राहू शकली आहे. आता तिला अजून चांगले चालता यावे, याकरिता शस्त्रक्रियेची गरज आहे. तसेच शरीरावर जागोजागी झालेल्या जखमांवर प्लास्टिक सर्जरीची शस्त्रक्रिया करणे ही आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. या शस्त्रक्रियांसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदतीची गरज आहे.
सध्या इस्लाम धर्मातील पवित्र रमज़ान महिना सुरू आहे. या महिन्यात दानधर्म करणाऱ्यांना मोठे पुण्य देण्याचा अल्लाह चा वादा आहे. एवढेच नव्हे तर या महिन्यात गरजवंतांना जो एक रुपया देईल त्याच्या नावे अल्लाह सत्तर रुपये दिले म्हणून नोंद करतो असे पवित्र क़ुरआन मध्ये नोंद आहे. तेव्हा लोकहो अशा प्रकारे सत्तर पट पुण्य कमविण्याची संधी सोडू नका. आपल्याकडून काढण्यात येणारी जकात, सदका, फ़ितरे यापैकी काहीही सायमाच्या उपचारासाठी द्या. जेणेकरून एका गरीब कुटुंबातील हात मजूर असलेल्या हुसेन बेग यांची मुलगी सायमा ही आपल्या पायावर उभी राहू शकेल, धावू शकेल आणि जिवनात काहीतरी करू शकेल.
यासाठी गरज आहे ती आपल्याकडून आर्थिक मदतीची. आर्थिक मदत देण्यासाठी 8888455282 सय्यद शफाऊद्दीन असहाबूद्दीन यांच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर मदत पाठवा किंवा लेखासोबत दिलेल्या क्यू आर कोड वर सुद्धा मदत पाठवू शकता.
*सायमा साठी धडपडणारे त्रिकूट*
जेव्हापासून सायमाबद्दल सय्यद शफाउद्दीन यांना माहित पडले तेव्हा त्यांनी समाजातील दानशूरांना आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले होते. ही बाब माहित झाल्यावर सा. खरा लोकमित्र चे संपादक पठाण हमीद खान आणि पत्रकार जावेद शेख हेही सायमाला बरी करण्याकरिता शक्य होईल ते कार्य करण्यासाठी झपाटले आहेत. सायमाला वेळोवेळी संचेती हॉस्पिटलमध्ये नेणे, उपचार करून परत आणणे याकामी सय्यद शफाउद्दीन, हमीद खान आणि जावेद शेख हे त्रिकूट सायमा साठी प्रचंड धडपड करीत आहे.
*लेखन - एस.एम.युसूफ़*
आसेफ़नगर, बीड
संपर्क - 9021 02 3121
============================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*


कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा