Breaking News

भर उन्हाळ्यात कडक हिवाळा; रोजेदारांनो तब्येत सांभाळा - एस.एम.युसूफ़


भर उन्हाळ्यात कडक हिवाळा; रोजेदारांनो तब्येत सांभाळा - एस.एम.युसूफ़

बीड (एस.एम.न्युज़) - गेल्या काही दिवसांपासून मध्यरात्रीनंतर प्रचंड मोठ्या प्रमाणात थंड पडू लागली आहे. अशा प्रकारे अचानक वातावरण बदलल्याने भर उन्हाळ्यात हिवाळा जाणवू लागला आहे. सध्या इस्लाम धर्मातील पवित्र रमज़ान महिना सुरू असल्याने मुस्लिम समाज रमज़ानचे रोज़े ठेवतो आहे. बदललेल्या या वातावरणात रोज़्यांवर विपरीत परिणाम होऊ नये याकरिता रोज़ेदारांनी तब्येत सांभाळावी असे आवाहन एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी केले आहे.
निसर्गात अचानकपणे कधी काय बदल होतील हे सांगता येत नाही. सध्या उन्हाळ्याचा हंगाम असून दिवसभर कडक ऊन आणि उकाडा होत आहे. मध्यरात्रीनंतर मात्र वातावरणात मोठा बदल होऊन चक्क हिवाळ्यापेक्षाही जास्त मोठ्या प्रमाणात थंड पडू लागली आहे. पहाटे फ़ज्र नमाज़च्या वेळी तर अक्षरशः अंगावर बर्फ टाकत असल्यासारखे गार वातावरण होऊ लागले आहे. यामुळे लोकांच्या तब्येतीवर या बदलाचा परिणाम मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. त्यात सध्या रमज़ानचा महिना सुरू असल्याने मुस्लिम समाज रमज़ानचे पवित्र रोज़े ठेवत आहे. रोज़ामध्ये शरीरात उष्णता वाढते म्हणून मुस्लिम समाजाचा रोज़ा सोडताना शरीरातील उष्णतेला कमी करण्यासाठी थंड पेयासह टरबूज, खरबूज यासारखी फळे फ्रिजमध्ये ठेवून ती थंड करून खाण्याकडे कल असतो. तसेच वातावरणातील दाहकता कमी करण्यासाठी दिवसभर पंखे, कुलर, असल्यास एसी चालविण्यावर भर असतो. उन्हाळ्यात या कृतीमुळे सहसा तब्येतीवर काही परिणाम होत नाही परंतु सध्या उन्हाळ्याच्या दिवसात दिवसभर जरी कडक ऊन पडत असले, उकाळा असला तरी मध्यरात्री नंतर मात्र अचानक हिवाळा सुरू झाला आहे. अशा वातावरणामध्ये थंड पेय आणि फ्रिज मध्ये ठेवलेले टरबूज, खरबूज आणि तत्सम फळे खाल्ल्याने रोज़ेदारांच्या तब्येतीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. ज्यात प्रामुख्याने सर्दी, पडसे, खोकला, डोकेदुखी, अंगदुखी इत्यादी होऊ शकतात. ज्यामुळे रोज़ेदारांचे रोजे बाधित होऊ शकतात. असे होऊ नये याकरिता रोज़ेदारांनी रोज़े ठेवण्याबरोबरच वातावरण बदलाकडेही कटाक्षाने नजर ठेवून त्याप्रमाणे आपले खान-पान व राहणीमान ठेवावे अन्यथा तब्येत बिघडल्यास लाख मोलाचे पवित्र रमज़ानचे पवित्र रोज़े ठेवण्यापासून वंचित रहावे लागू शकते. तेव्हा अशा वातावरणात रोजेदारांनी तब्येतीची काळजी घ्यावी असे आवाहन एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी केले आहे.
==============================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत