Breaking News

सद्भावना पदयात्रेमध्ये सहभागी होणार - नितीन जायभाये

बीड शहर बचाव मंच सदैव सद्भावने सोबतच...!

बीड (एस.एम.न्युज़) - राष्ट्रीय इंदिरा काँग्रेस पक्षाच्या व काही सामाजिक संघटना, इतर काही पक्ष या सर्वांच्या वतीने पुढाकार घेऊन मस्साजोग, केज येथून बीड पर्यंत काढण्यात येणाऱ्या सद्भावना' पदयात्रेमध्ये काँग्रेस व इतर मित्र पक्षांचे पदाधिकारी, इंदिरा काँग्रेस पार्टीचे बीड शहराध्यक्ष परवेज कुरेशी, इंटक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रामधन जमाले  तसेच त्यांचे सर्व सहकारी,आमच्या सर्व स्नेही बांधवांच्या आमंत्रणानंतर  बीड शहर बचाव मंचच्यावतीने अध्यक्ष/निमंत्रक नितीन जायभाये हे सद्भावना पदयात्रेमध्ये सहभागी होणार आहेत, असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
पत्रकात म्हटले आहे की, काही राजकीय नेते पुढारी स्वतःच्या राजकीय महत्त्वकांक्षा पूर्ण करण्यासाठी जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करून, विषमतेचे विष समाजामध्ये पसरवून स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजण्याचे डाव साधत आहेत. विषमतेचे विष पेरून गढूळ केल्या जात असलेल्या या सामाजिक परिस्थितीमध्ये सर्वसामान्य, निर्दोष माणूस भरडला जात आहे. जाती जातीमध्ये द्वेष निर्माण करण्यासाठी रोज नवनवीन कटकारस्थाने व योजना आखल्या जात आहेत. सामाजिक भेदभाव, जाती जातीमध्ये वाढत चाललेली द्वेष भावना आणि त्यातूनच निर्माण होणारे दुष्परिणाम, अराजकता, कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न, गुन्हेगारी प्रवृत्तीला मिळणारे बळ या सर्व सामाजिक संतुलन नष्ट करणाऱ्या प्रवृत्तींपासून समाजाला व पुढच्या पिढीला वाचविणे गरजेचे आहे. सामाजिक विवेक व लोकांची सद्सद्विवेक बुद्धी जागृत ठेवणे गरजेचे आहे. अशाच उदात्त भावनेतून समाजामध्ये न्याय भावना, न्यायव्यवस्था प्रस्थापित होण्यासाठी सद्भावना जागृत राहणे गरजेचे आहे. सामाजिक सलोखा, ऐक्य वाढविण्यासाठी सद्भावना यात्रेचे आयोजन उपयुक्त ठरू शकते. तरी आयोजकांनी सदभावना यात्रे सारखा स्तुत्य उपक्रम हाती घेऊन दिलेल्या आमंत्रणाचे आभार मानून, सद्भावना यात्रेसारखा स्तुत्य उपक्रम हाती घेतल्याबद्दलही सर्व आयोजकांचे आभार मानले आहे. बीड शहर बचाव मंचचे सर्वच पदाधिकारी तथा सर्व सदस्य आणि सद्भावनेचे खरे अनुयायी म्हणून मोठ्या संख्येने सद्भावना यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत. तरी बीड शहरातील समस्त समाज बांधवांनी मोठ्या बहुसंख्येने सद्भावना यात्रेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहनही बीड शहर बचाव मंचच्या वतीने करण्यात आले आहे.
==============================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत