Breaking News

मनसे शहराध्यक्ष अमरजान पठाण यांच्या बीड न.प.कडे विविध मागण्या


मनसे शहराध्यक्ष अमरजान पठाण यांच्या विविध मागण्या

श्रीकृष्ण मंदिर, निळकंठेश्वर मंदिर आणि खासबाग देवी मंदिर परिसरात हाय मास्ट दिवे लावा

हज़रत शाह शमशोद्दीन दरगाह कब्रस्तान ची सफाई करण्यात यावी

बीड (एस.एम.न्युज़) - शहरातील हत्तीखाना भागात असलेल्या श्रीकृष्ण मंदिर परिसरात पाच हाय मास्ट दिवे बसवून बाजूला असलेल्या हज़रत शाह शमशोद्दीन दरगाह कब्रस्तान ची सफाई करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बीड नगर परिषदेत दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
याविषयी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बीड शहरातील हत्ती खाना येथे श्रीकृष्ण मंदिर असून या ठिकाणी श्री. चक्रधर स्वामी महाराजांनी चार महिने वास्तव्य केला असून येथे महानुभव पंथाचे आश्रम सुद्धा आहे. श्रीकृष्ण मंदिर येथे बीड जिल्ह्यातूनच नव्हे तर राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. या ठिकाणी हाय मास्ट दिवे बसवण्याची गरज असून बीड नगर परिषद मार्फत श्रीकृष्ण मंदिर परिसरात हाय मास्ट दिवे बसविण्यात यावे. तसेच हत्ती खाना येथील हज़रत शाह शमशोद्दीन दरगाह कब्रस्तान असून सध्या मुस्लिम बांधवांचा पवित्र रमज़ान महिना सुरू असून रमज़ान निमित्त कब्रस्तान मध्ये असलेल्या शाह शमशोद्दीन दरगाह येथे दरुद - फातीहा पठण करण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येत असतात. या ठिकाणी साफसफाई करण्याची गरज आहे.
         तरी श्रीकृष्ण मंदिर, निळकंठेश्वर मंदिर, खासबाग देवी मंदिर परिसरात हाय मास्ट दिवे बसवून हज़रत शाह शमशोद्दीन दरगाह कब्रस्तान ची सफाई करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने वर्षाताई जगदाळे (महिला राज्य उपाध्यक्ष) सदाशिव बिडवे (जिल्हा उपाध्यक्ष) यांच्या प्रमुख उपस्थितीत अरमजान पठाण (बीड शहराध्यक्ष) यांच्या नेतृत्वाखाली बीड नगर परिषद कार्यालयाचे उपमुख्याधिकारी सम्राट कदम यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी मोहज्जीब इनामदार, दत्तात्रेय डावकर सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
==============================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत