आग ओकणाऱ्या उन्हात रोजे ठेवून लोकांना गोड रसदार फळे उपलब्ध करून देणारे रईस बागवान
आग ओकणाऱ्या उन्हात रोजे ठेवून लोकांना गोड रसदार फळे उपलब्ध करून देणारे रईस बागवान
बीड (एस.एम.न्युज़) - सध्या कडक उन्हाळा सुरू आहे. दिवसागणिक उन्हाचा पारा वर चढत आहे. अशा वातावरणात सध्या इस्लाम धर्माचा पवित्र रमज़ान महिना सुरू आहे. मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने रोजे ठेवत आहेत. शहरातील नगर नाका भागात गेल्या ३५ वर्षांपासून ग्राहकांना विविध फळे उपलब्ध करून देणारे रईस बागवान आणि त्यांचा चमू या कडाक्याच्या उन्हात सुद्धा रोजे ठेवून गोड आणि रसदार फळे उपलब्ध करून देत आहे.
शहरातील नगर नाका परिसरात रईस बागवान यांची फळाची दुकान म्हटले की, ग्राहकांना खात्रीशीर गोड आणि रसदार फळे मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणून सुपरिचित आहे. गेल्या ३५ वर्षांपासून ते आपल्या पदरात दोन पैसे कमी नफा मिळाला तरी चालेल मात्र ग्राहकांना चांगली दर्जेदार गोड फळे मिळावी यासाठी ते नेहमीच प्रयत्नरत असतात. मग ऋतू आणि वातावरण कोणताही असो. हिवाळा, पावसाळा किंवा उन्हाळा याची तमा न बाळगता ते आग ओकणाऱ्या उन्हात रोजे ठेवून लोकांना गोड रसदार फळे उपलब्ध करून देणारे रईस बागवान हे रियाज़ बागवान, लारेब बागवान, आरेफ़ बागवान, अख़ील बागवान, मुश्रफ़ बागवान, इरफ़ान बागवान या आपल्या चमूसह चांगल्या दर्जेदार फळासह सेवा देण्यास नेहमीच तत्पर असतात. अशाच प्रकारे कडकडत्या उन्हात पवित्र रमजान महिन्याचे रोजे ठेवून दिवसभर उन्हापासून बचाव करताना छत्र्या लावून फळे विकतात. दर्जेदार फळांमुळे त्यांच्याकडे ग्राहक लांब लांबून येऊन फळे घेऊन जातात. त्यातही उन्हाळ्याच्या हंगामात त्यांच्याकडे लालभडक गोड टरबूज आणि खरबूज घेऊन जाण्यासाठी ग्राहकांची रीघ लागलेली असते. ही फळे खाल्ल्यानंतर जसे ग्राहकांना चांगले फळ खाल्ल्याचे समाधान मिळते तसेच आपल्या भरवशावर लांब लांबून येऊन फळे घेऊन जाणाऱ्या ग्राहकाला समाधान मिळत असल्याचे पाहून आपल्यालाही समाधान मिळते असे रईस बागवान म्हणतात. =============================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा