Breaking News

अखेर सायमाला आधार कार्ड मिळाला; पोस्टमास्तर विनोद गर्जे यांची शिष्टाई फळाला


अखेर सायमाला आधार कार्ड मिळाला 
पोस्टमास्तर विनोद गर्जे यांची शिष्टाई फळाला

पाटोदा (एस.एम.न्युज़) - सध्याच्या युगात एखाद्याचा आधार नंबर नसणे म्हणजे त्याच्या अस्तित्वावरच प्रश्न चिन्ह उभे राहते. असंच काहीसं गेल्या ९ वर्षांपासून उपचाराअभावी अपंगत्व आलेल्या सायमा सोबत घडलं होतं परंतु पाटोदा पोस्ट ऑफिसचे पोस्टमास्तर विनोद गर्जे यांची शिष्टाई फळाला आली. सायमाला आधार कार्ड नंबर मिळाला.
अनवधनाने घडलेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या सायमाला योग्य उपचार न मिळाल्याने अंपगत्व आले. गेल्या ९ वर्षांपासून ती अंथरुणावर पडुन होती. ही गंभीर बाब जेव्हा सय्यद शफाओद्दीन, पत्रकार हमीदखान पठाण, जावेद शेख यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी प्रसिद्धी माध्यमाद्वारे आर्थिक मदतीसाठी लोकसहभागाचे आवाहन केले होते. त्यामुळे अनेक दानशूरांनी स्वतःहुन पुढे येत सढळ हाताने मदत सुरू केली. ती अविरतपणे सुरू असुन त्यातुनच सायमावर उपचार सुरू आहेत. मात्र शासकीय पातळीवर तिचे अस्तित्व सिध्द करण्यासाठी महत्वपूर्ण मानले जाणारे आधार कार्ड नसल्याने मोठी अडचण येत होती. तिच्या कुटुंबियांनी अनेकदा आधार कार्ड काढण्याचा प्रयत्न केला होता मात्र अपयश येत होते. या गंभीर घटनेकडे पाटोदा पोस्ट ऑफिसचे पोस्टमास्तर विनोद गर्जे यांचे सय्यद शफाओद्दीन व पत्रकार हमीदखान पठाण, जावेद शेख यांनी लक्ष वेधले. त्यांनी आधार कार्ड का रिजेक्ट होते याची इत्यंभुत माहिती घेत आठ दिवस बीड, औरंगाबाद येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधत सायमाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी स्वतः जबाबदारी घेत नगरपंचायत, तहसील कार्यालय तसेच शाळेतील महत्त्वाची कागदपत्रांची जुळवाजुळव करून दि.२७ फेब्रुवारीला आधार कार्ड ऑनलाइन केले होते. या दरम्यान आधार कार्ड रिजेक्ट होऊ नये यासाठी वरिष्ठांशी वेळोवेळी पाठपुरावा केला. मात्र १२ दिवसाचा कालावधी लोटला तरी आधार कार्ड वेटींग मध्येच का आहे? याचा अंदाज येत नसल्याने औरंगाबाद येथील कार्यालयाचा वेळ मागुन घेत सायमालाच तिथे घेऊन जाण्याची योजना आखली। मात्र दि.१५ मार्च रोजी सायमाचा आधार कार्ड ऑनलाइन झाल्याचा मेसेज आला आणि सर्वांनी सुटेकेचा निश्वास सोडला. खऱ्या अर्थाने पोस्टमास्तर विनोद गर्जे यांचा पाठपुरावा व शिष्टाई फळाला आली. याच संदर्भात दि.१९ मार्च बुधवार रोजी पोस्ट ऑफिस कार्यालयाच्या वतीने सायमाला आधार कार्ड देण्यात आले. यावेळी सायमा व सय्यद शफाओद्दीन, पत्रकार जावेद शेख, हमीदखान पठाण, सचिन शिंदे आदींच्या वतीने पोस्टमास्तर विनोद गर्जे, काकडे, तावरे, सचिन कांबळे, प्रसाद मोराळे, कु.अंकिता सावंत, बेद्रे तथा इतर कार्यालयीन सहकाऱ्यांचा शाल, पुष्पहार, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

*काम म्हणजे माझ्यासाठी पर्वणी, कायमच सेवा देण्याचा प्रयत्न -विनोद गर्जे*
मी स्वतः पाटोदा तालुक्यातील महासांगवी गावचा असुन पाटोदा शहरातील तथा तालुक्यातील ग्राहकाचे काम म्हणजे माझ्यासाठी पर्वणी समजून कायमच सेवा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे आणि भविष्यातही करत राहणार.
सायमा हिला काहीतरी मदत करू शकलो हे माझं भाग्य. ईश्वर, अल्लाहने त्यांना लवकर त्यांच्या पायावर उभं करावं अशी प्रार्थना करतो.
*- विनोद गर्जे (पोस्टमास्तर)*
=============================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत