Breaking News

ज्येष्ठ समाजसेवक डॉ. संजय तांदळे यांचा पोलीस प्रशासनाच्या वतीने सत्कार


ज्येष्ठ समाजसेवक डॉ. संजय तांदळे यांचा पोलीस प्रशासनाच्या वतीने सत्कार

बीड (एस.एम.न्युज़) - शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय तांदळे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत पोलीस प्रशासनाच्या वतीने मंगळवार दिनांक १८ रोजी
वाहतूक शाखेच्या पोलीस स्टेशनमध्ये त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
बीड शहरातील मित्र नगर भागातील रहिवासी असलेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय तांदळे हे मागील काही वर्षांपासून सामाजिक कार्य करत आहेत. बीड आणि परिसरात काही अपघात झाल्याची माहिती मिळताच ते संबंधित पोलीस स्टेशनला कळवितात. नुसतं कळवून थांबत नाहीत तर पोलिसांच्या व मित्रांच्या मदतीने लागलीच तातडीने घटनास्थळी भेट देऊन संबंधितांना मदत करण्याचं काम करतात. त्यांच्या या कार्यामुळे शेकडो अपघातग्रस्तांना तातडीची मदत मिळाली आहे. तर अनेक जणांचे प्राण वाचले आहेत. तसेच बीड शहरातील गोरगरीब आणि निराधार लोकांना स्वखर्चातून मदत उपलब्ध करून देतात. शहरातील मनोरुग्ण व्यक्तींचं पोलिसांच्या सहकार्याने  पुनर्वसन करून त्यांना चांगले जीवन जगण्यासाठी मोठा आधार दिला आहे. त्याचबरोबर बीड शहरातील विविध सामाजिक उपक्रमात त्यांचा हिरीरीने सहभाग असतो. सामाजिक कार्याबरोबरच ते निरोगी व निरामय जीवन कसे राहावे यासाठी जनतेला तसेच पोलिसांना योगाचे प्रशिक्षण देण्याचे काम करतात. त्यांच्या या सामाजिक उपक्रमाची दखल घेऊन पोलीस प्रशासनातील जिल्हा वाहतूक शाखेचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष सानप, पोलीस उपनिरीक्षक विजय जाधवर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेख उस्मान यांनी दखल घेऊन मंगळवार दिनांक १८ रोजी सुभाष रोड येथील वाहतूक शाखेच्या पोलीस स्टेशनमध्ये त्यांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी पोलीस हवालदार श्रीकांत पाखरे, शिवदास घोलप, चालक संतोष हारके, जलदूत बाजीराव ढाकणे आदी उपस्थित होते.
*पोलीस प्रशासनाकडून झालेला सत्कार पुढील कार्यास प्रेरणा देणारा - डॉ. संजय तांदळे*
पोलीस प्रशासनाकडून आज माझ्या कामाची दखल घेऊन माझा यथोचित सन्मान करण्यात आला. हा सन्मान म्हणजे खऱ्याखुऱ्या कामाची आणि प्रामाणिक कार्याची मला पावती मिळाली असल्याची भावना यावेळी डॉ संजय तांदळे  यांनी व्यक्त केली.
=============================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत