Breaking News

महावितरण कंपनीने वीज खंडित करताच ९ कोटी ६५ लाखांची थकबाकी वसूल


महावितरण कंपनीने वीज खंडित करताच ९ कोटी ६५ लाखांची थकबाकी वसूल

वीज खंडीत झालेल्या ३ हजार ३३५ वीजग्राहकांनी थकबाकी भरली

व्याज व विलंब आकाराचे ८ कोटी ६ लाख रूपये झाले माफ

महावितरणच्या अभय योजनेला प्रतिसाद, अभय मिळवण्यासाठी उरले केवळ १३ दिवस

बीड (एस.एम.न्युज़) - वीजबिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरुपी तोडलेल्या घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वर्गवारीतील ३ हजार ३३५ वीजग्राहकांनी अभय योजनेचा लाभ घेत ९ कोटी ६५ लाख रूपयांचा भरणा केला आहे. या योजने अंतर्गत केवळ मुद्दल भरून संपूर्ण व्याज आणि विलंब आकार माफ करण्यात येत असल्याने व्याज व विलंब आकाराचे तब्बल ८ कोटी ६ लाख रूपयांची सुट मिळवली आहे. अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी आता केवळ १३ दिवसांचा अवधी शिल्लक असल्याने कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडीत झालेल्या थकबाकीदार वीजग्राहकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
बीड जिल्ह्यातील ३ हजार ३३५ वीजग्राहकांनी ९ कोटी ६५ लाख रूपयांचा भरणा करत ८ कोटी ६ लाख रूपयांची भरघोस सुट प्राप्त केली आहे. आंबाजोगाई विभागातील धारूर उपविभागातील १२० वीजग्राहकांनी ९ लाख रूपयांचा भरणा करत १२ लाख रूपयांची सुट मिळवली आहे. केज उपविभागातील १५७ वीजग्राहकांनी ११ लाख रूपयांचा भरणा करत ७ लाख रूपयांची सुट मिळवली आहे, माजलगाव उपविभागातील २४२ वीजग्राहकांनी ४० लाख रूपयांचा भरणा करत ३६ लाख रूपयांची सुट मिळवली आहे, परळी उपविभागातील १४१ वीजग्राहकांनी ३ कोटी २७ लाख रूपयांचा भरणा करत ३ कोटी ६ लाख रूपयांची सुट मिळवली आहे, तेलगाव उपविभागातील ११९ वीजग्राहकांनी १७ लाख रूपयांचा भरणा करत २० लाख रूपयांची सुट मिळवली आहे, तर आंबाजोगाई उपविभागातील १७८ वीजग्राहकांनी २ कोटी ७३ लाख रूपयांचा भरणा करत १ कोटी ३० लाख रूपयांची सुट मिळवली आहे.
त्याचबरोबर बीड विभागातील २ हजार ३७८ वीजग्राहकांनी २ कोटी ८८ लाख रूपयांचा भरणा करत २ कोटी ९५ लाख रूपयांची सुट मिळवली आहे. यामध्ये आष्टी उपविभागातील १९२ वीजग्राहकांनी २२ लाख रूपयांचा भरणा करत २१ लाख रूपयांची सुट मिळवली आहे, बीड शहर उपविभागातील २९३ वीजग्राहकांनी ७४ लाख रूपयांचा भरणा करत ६८ लाख रूपयांची सुट मिळवली आहे. बीड ग्रामीण उपविभागातील ४५४ वीजग्राहकांनी ५३ लाख रूपयांचा भरणा करत ७१ लाख रूपयांची सुट मिळवली आहे, गेवराई उपविभागातील ८४४ वीजग्राहकांनी ९२ लाख रूपयांचा भरणा करत ८५ लाख रूपयांची सुट मिळवली आहे, पाटोदा उपविभागातील २१७ वीजग्राहकांनी २१ लाख रूपयांचा भरणा करत २० लाख रूपयांची सुट मिळवली आहे. तसेच शिरूर कासार उपविभागातील ३७८ वीजग्राहकांनी २६ लाख रूपयांचा भरणा करत ३१ लाख रूपयांची सुट मिळवल्याचा समावेश आहे.
अभय योजनेत मूळ बिलाच्या ३० टक्के रक्कम भरून ऊर्वरित ७० टक्के रक्कम सहा हफ्त्यात भरण्याची सवलतही ग्राहकांना देण्यात आली आहे. जे घरगुती, व्यावसायिक इत्यादी लघुदाब ग्राहक एक रकमी थकित बिल भरतील त्यांना दहा टक्के तर उच्चदाब औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांना पाच टक्के सवलत आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार कोणत्याही जागेच्या मालक किंवा खरेदीदार किंवा ताबेदार यांनी वीजबिलाची थकबाकी रक्कम भरणे बंधनकारक आहे. रक्कम न भरल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते. त्यामुळे वीज ग्राहकांनी सवलतीचा लाभ घेऊन चिंतामुक्त व्हावे, असे आवाहन महावितरण कंपनीने केले आहे.
=============================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत