तरुण वकिलांचा न्यायासाठी लढा: ७ वर्षांनंतर कैद्याची सुटका
तरुण वकिलांचा न्यायासाठी लढा: ७ वर्षांनंतर कैद्याची सुटका
औरंगाबाद (एस.एम.न्युज़) - ॲड. साजेद डब्ल्यू. खान आणि ॲड. सय्यद हसीब अख्तर या दोन तरुण वकिलांनी आपल्या कर्तव्यनिष्ठेने आणि कठोर परिश्रमाने एका निर्दोष व्यक्तीला न्याय मिळवून दिला आहे. त्या व्यक्तीवर छावणी पोलीस ठाण्यात दाखल विशेष मकोका प्रकरणात खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि कोणतीही मदत वा आर्थिक साधनसंपत्ती नसल्यामुळे तो सात वर्षांपासून कारागृहात अडकून पडला होता.
या अन्यायाची दखल घेत ॲड. खान आणि ॲड. सय्यद हसीब यांनी निःशुल्क (प्रो बोनो) त्याची अपील याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली. मा. न्यायमूर्ती वाघवसे यांनी या विशेष मकोका खटल्यातील शिक्षा निलंबित करण्याचा आदेश दिला. ज्यामुळे सात वर्षांपासून तुरुंगात असलेला हा निर्दोष कैदी आता बाहेर येणार आहे. आणि पुन्हा एकदा स्वातंत्र्याचा श्वास घेणार आहे.
न्यायालयाचा हा निकाल तरुण कायदेतज्ज्ञांच्या चिकाटीचे आणि न्यायासाठी झटण्याच्या निष्ठेचे प्रतीक आहे. पैशाअभावी किंवा आधाराविना न्याय न मिळालेल्यांसाठी हा निर्णय आशेचा किरण आहे.
ॲड. साजेद डब्ल्यू. खान आणि ॲड. सय्यद हसीब अख्तर यांच्यासाठी हा केवळ एक खटला नव्हता, तर हा एक न्यायासाठी घेतलेला व्रत होता. समाजातील दुर्बल आणि वंचितांना न्याय मिळवून देण्याच्या त्यांच्या सेवाभावी कार्यामुळे कायदा हा केवळ अधिकारधारींसाठी नसून सर्वांसाठी आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
*बीडकरांसाठी अभिमानाची बाब!*
ॲड. साजिद खान आणि ॲड. सय्यद हसीब अख्तर या तरुण कायदे तज्ञांपैकी सय्यद हसीब अख्तर हे बीड शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील उर्दू विभागाचे अशासकीय सदस्य तथा तंझीम तरक्की उर्दू या संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष सय्यद हसीन अख्तर यांचे सुपुत्र आहेत. यामुळे सय्यद हसीब यांना समाजसेवेचा वसा हा वडिलांकडून बालपणापासूनच मिळालेला आहे. त्यांनी हा खटला कुठलीही फी न आकारता विनामूल्य लढवून हा वसा जपला आहे. यामुळे बीडकरांसाठी ही अभिमानाची बाब आहे.
==============================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा