मिले जो कड़ी-कड़ी एक ज़ंजीर बने! ऐतिहासिक कारंजा टॉवर साठी अनेक हात सरसावू लागले
मिले जो कड़ी-कड़ी एक ज़ंजीर बने!
ऐतिहासिक कारंजा टॉवर साठी अनेक हात सरसावू लागले
बीड (एस.एम.न्युज़) - शहराची ऐतिहासिक ओळख असलेल्या कारंजा टॉवर ची दुर्दशा लवकरच संपणार असे आता वाटू लागले आहे. कारण टॉवर चे नूतनीकरण परिपूर्ण व्हावे. या ऐतिहासिक इमारतीला पूर्व वैभव पुन्हा प्राप्त व्हावे. याकरिता ज्येष्ठांसह तरुणांची फळी पुढे सरसावली आहे. यामुळे मिले जो कड़ी-कड़ी एक ज़ंजीर बने या म्हणीप्रमाणे लोक आपसात जोडले जात असून कारंजा टॉवर चे रूप सर्वांग सुंदर करण्यासाठी झपाटले आहे.
कारंजा टॉवरचे नूतनीकरण परिपूर्ण करावे म्हणून १४ फेब्रुवारी २०२५ रोजी देण्यात आलेल्या निवेदनानंतर आतापर्यंत प्रत्येक दिवशी कारंजा टॉवरसाठी ज्येष्ठ आणि तरुण मिळून काही ना काही प्रयत्न व कार्य करीत आहे. टॉवरला लागून प्रथम चार सिमेंटचे बाकडे ठेवण्यात आले. आता त्यात अजून एका सिमेंट बाकड्याची भर पडली असून आता सिमेंट बाकड्यांची संख्या पाच झाली आहे. अजूनही दहा एक सिमेंट बाकड्यांची गरज आहे. सर्वांचे सहकार्य असेच राहिले तर उर्वरित जागेवर आवश्यक त्या संख्येत सिमेंटचे बाकडे येतील हे नक्की. या बाकड्यांमुळे ज्येष्ठ व वयोवृद्धांसह तरुणांना सुद्धा निसर्गरम्य व नयनरम्य वातावरणात बसण्याचा आनंद मिळू लागला आहे.
*लोकसहभागातून आतापर्यंत करण्यात आलेली कामे*
आतापर्यंत लोकसहभागातून कारंजा टॉवरची साफसफाई करून पाण्याने धुऊन घेण्यात आले आहे. पाण्याच्या फवाऱ्यासाठी बांधण्यात आलेल्या हौदाची साफसफाई करण्यात आली आहे, तेही धुवून घेण्यात आले आहे. ऐतिहासिक कारंजा टॉवरच्या इमारतीला मोठ्या प्रमाणात विद्रूप करणारे डिजिटल बॅनर चे फ्रेम काढून टाकण्यात आले आहे. टॉवर समोर कचरा आणून टाकणाऱ्यांना येथे कचरा टाकू नका, हे टॉवर आपल्या शहराची ऐतिहासिक ओळख आहे असे समजावून सांगितले जात आहे.
*बीड नगर परिषद आणि जिल्हा प्रशासन निपचित*
एकीकडे लोकसहभागातून अशाप्रकारे कार्य होत असताना दुसरीकडे बीड नगर परिषद आणि जिल्हा प्रशासन मात्र बेडूक गिळून निपचित पडलेल्या सापासारखे अजूनही बेशुद्ध असल्याचे दिसत आहे. हे दोन्ही सरकारी प्रशासन अजूनही कारंजा टॉवर साठी आवश्यक असलेली कामे करण्यासाठी पुढे आलेले नाहीत.
*आता सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक स्वस्थ बसणार नाहीत*
बीड नगर परिषदेसह जिल्हा प्रशासनाची अशी अनास्था पाहून मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रमेशराव गंगाधरे, तालेब पटेल, युवा कार्यकर्ते फारुख शेख यांनी जोपर्यंत कारंजा टॉवर चे नूतनीकरण परिपूर्ण होत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही असे म्हटले आहे.
==============================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा