Breaking News

गायक निवेदक आकाश जाधव विविध पुरस्कारांनी सन्मानित


गायक निवेदक आकाश जाधव विविध पुरस्कारांनी सन्मानित

बीड (एस.एम.न्युज़) - शहरातील सुप्रसिद्ध गायक तथा निवेदक आकाश जाधव यांना गेल्या काही दिवसात विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामुळे समाजातील सर्व स्तरातून त्यांचे विशेष अभिनंदन होत आहे.
यात निर्भीड पत्रकार संघ माजलगाव च्या वतीने मूकनायक कला भूषण पुरस्कार रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी श्रद्धेय आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते सपत्नीक गायिका (संध्या आकाश जाधव) सन्मानित करण्यात आले. रयत सामाजिक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य बीड च्या वतीने कला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल कलारत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. चंपावती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या माजी विद्यार्थी एस.एस.सी बॅच २००२-०३ माजी विद्यार्थी स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात उत्कृष्ट सूत्रसंचालन केल्याबद्दल उत्कृष्ट निवेदक सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. अशाप्रकारे गेल्या काही दिवसात सुप्रसिद्ध गायक निवेदक आकाश जाधव यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने त्यांच्यावर समाजातील सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
=============================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत