Breaking News

ॲड. मोसीन पिंजारी यांची सरकारी वकील पदी निवड; सामाजिक कार्यकर्त्यांकडून सत्कार


ॲड. मोसीन पिंजारी यांची सरकारी वकील पदी निवड; सामाजिक कार्यकर्त्यांकडून सत्कार

बीड (एस.एम.न्युज़) - अल्पावधीतच आपल्या कार्यकर्तृत्वाने ठसा उमटविलेले ॲड. मोसीन अहमद एन.ए.पिंजारी यांची नुकतीच लीगल असिस्टंट डिफेन्स कौन्सिल (एल.ए.डी.सी.) मध्ये निवड झाली. या प्रित्यर्थ सामाजिक कार्यकर्त्यांकडून त्यांचा शाल आणि पुष्पहाराने घालून सत्कार करण्यात आला.
ॲड. मोसीन पिंजारी हे बी.एस.सी.एल.एल.बी.एल.एल.एम. असे उच्च विद्या विभूषित असून ते आतापर्यंत बीड जिल्हा व सत्र न्यायालयात खाजगी वकील म्हणून उत्कृष्ट कार्य करीत होते. या सोबतच विधी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणूनही कार्यरत होते. त्यांची नुकतीच लीगल असिस्टंट डिफेन्स कौन्सिल मध्ये निवड करण्यात आली. आता ते सरकारी वकील म्हणून कार्य करतील. त्यांच्या निवडीमुळे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक रमेशराव गंगाधरे, तरुण तडफदार कार्यकर्ते सय्यद इलयास, शेख जिशान, शेख समीर आणि अल्ताफ पिंजारी यांनी त्यांचा शाल व पुष्पहाराने सत्कार करून पुढील कारकिर्दीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.
=============================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत