Breaking News

मोमीन अफिफा फाते‌मा बी.डी.एस. परिक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण


मोमीन अफिफा फाते‌मा बी.डी.एस. परिक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

बीड (एस.एम.न्युज़) - शहरातील नाळवंडी रोड वरिल नामांकित आदित्य डेन्टल कॉलेज, बीड ची विद्यार्थीनी मोमीन अफिफा फातेमा अब्दुल शाफे हिने (बी.डी.एस.) २०२४ शेवटच्या परिक्षेत ९८३ गुण घेऊन ७८.६४ टक्के गुण प्राप्त करून विशेष गुणवत्तेने यश संपादन केले.
मोमीन अफिफा फातेमा हिने १६०० पैकी ९८३ गुण मिळवुन विशेष प्रविण्यात यश संपादन केले आहे. तिने आपल्या अलौकिक यशाचे श्रेय आपले आई-वडील व आपले अथक परिश्रम व आदित्य डेन्टल कॉलेज, बीड च्या संचालिका डॉ. आदिती सुभाषचंद्रजी सारडा व प्राचार्य/डिन डॉ. हिमांशू श्रीवास्तव यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन दिल्याबद्दल ७८.६४ टक्के गुण प्राप्त करून विशेष प्राविण्याने यश संपादन केले.
मोमीन अफिफा फातेमा यांनी पुढे एम.डी.एस. करून वैद्यकिय क्षेत्रात रुग्ण सेवा करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.
मोमीन अफिफा फातेमा यांचे वडील बलभीम चौक बीड येथे गेल्या ३५ वर्षांपासून शाफे मेडिकल बीड द्वारा वैद्यकिय क्षेत्रात औषध सेवा देत आहेत.
=============================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत