Breaking News

एक असेही अनोखे आंदोलन मोहीमेत सहभागी व्हा - रूपाली देशपांडे


शहराच्या प्रत्येक भागातील गलिच्छतेचे फोटो काढून पाठवा
एक असेही अनोखे आंदोलन मोहीमेत सहभागी व्हा - रूपाली देशपांडे

बीड (एस.एम.न्युज़) - गेल्या काही वर्षांत बीड शहराची स्वच्छतेबाबत झालेली दुर्दशा पाहता शहरातील प्रत्येक भागात राहणाऱ्या नागरिकांनी आपापल्या प्रभागातील गलिच्छतेचे फोटो काढून पाठवावे आणि एक असेही अनोखे आंदोलन मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन लेखिका तथा सामाजिक कार्यकर्त्या रूपाली देशपांडे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून केले आहे.
याविषयी दिलेल्या प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे की, आतापर्यंत अनेक नागरिकांनी बीड शहर स्वच्छतेसाठी खूप निवेदने दिली,अर्ज केले,आंदोलन हि केले परंतु काहीही फरक पडला नाही. सगळे काही जैसे थेच चालू आहे. लोकांना हि काही फरक पडत नाही. कचरा शेजारी असला तरी चालेल. स्वच्छता अभियान मध्ये आपल्याला या वेळेस एक अनोखे आंदोलन करायचे आहे. यासाठी तुम्हा सर्वांच्या मदतीची अपेक्षा आहे. या आंदोलनात तुम्ही घरबसल्या सहभागी होवू शकता. त्यासाठी कोठेही जाण्या-येण्याची गरज नाही. फक्त तुमच्या परिसरातील, गल्लीतील, कचरा कुंडी म्हणजे जिथे कचरा उघड्यावर पडला आहे, तेथील फक्त फोटो काढून पाठवायचे आहे. फोटो सोबत तुमच्या परिसराचे नाव लिहून पाठवायचे. बस एवढंच करायचं आहे. शहरात राहणाऱ्या नागरिकांनी मनात आणले तर हे आंदोलन खूप मोठ्या स्वरूपाचे होईल. आलेल्या सर्व फोटोंचे संकलन करून सर्व वर्ग एकच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना ते पाठविण्यात येणार आहे तसेच प्रसिद्धी माध्यमातून सुद्धा ते प्रकाशित करण्यात येतील. तरी बीड शहरात राहणाऱ्या सर्व नागरिकांना विनंती कि आपण सर्वांनी या अनोख्या आंदोलनात सहभागी होऊन मोठ्या संख्येने फोटो पाठवावे. फोटो ८८८८९५५५३९ या भ्रमणध्वनी क्रमांकावर पाठवावे. हे आंदोलन आपल्या सर्वांचे आहे. आपल्याला बीड शहर स्वच्छ करायचे आहे.
तरी कृपया सर्वांनी गंभीर होऊन या अनोख्या आंदोलनात सहभागी व्हावे. असे आवाहन लेखिका तथा सामाजिक कार्यकर्त्या रुपाली देशपांडे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून केले आहे.

*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत