Breaking News

केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे! ऐतिहासिक कारंजा टॉवर कात टाकू लागले


केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे!

ऐतिहासिक कारंजा टॉवर कात टाकू लागले

बीड (प्रतिनिधी) - गेल्या दहा वर्षांपासून परिपूर्ण नूतनीकरणाच्या प्रतीक्षेत असलेल्या तसेच बीड शहराची ओळख असलेल्या ऐतिहासिक कारंजा टॉवर ची गेल्या काही दिवसात परिपूर्णतेकडे वाटचाल सुरू आहे. यामुळे केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे ही म्हण पुन्हा एकदा सिद्ध होत आहे.

सन २०१४ सालापासून ऐतिहासिक कारंजा टॉवरचे परिपूर्ण नूतनीकरण रखडलेले आहे. यामुळे कारंजा टॉवर ची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. या ऐतिहासिक वास्तूची गरिमा आणि गौरव अबाधित राहावे, ही वास्तू परिपूर्ण व्हावी म्हणून १४ फेब्रुवारी २०२५ रोजी एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रमेशराव गंगाधरे यांनी जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी, पोलीस अधीक्षक आणि तहसीलदार यांना निवेदन देऊन कारंजा टॉवर चे नूतनीकरण परिपूर्ण करावे अशी मागणी केली आहे. यानंतर तालेब पटेल आणि मिर्झा अब्दुल रऊफ बेग यांनीही प्रशासनाकडे निवेदन देऊन हीच मागणी लावून धरली. या दोन्ही बाबी प्रसिद्धी माध्यमातून समाजाच्या पटलावर आल्याने नागरिकांमध्ये कारंजा टॉवर विषयी जागरूकता निर्माण झाली. आणि कारंजा टॉवर लगत सिमेंटचे १० बाकडे ठेवण्यात आले. आता या बाकड्यांवर सकाळ, संध्याकाळ आणि रात्री आबालवृद्ध बसून आनंद घेत आहे. टॉवर समोर डिजिटल बॅनर लावणे आणि कचरा टाकण्यावर प्रतिबंध लावण्यात आला आहे. आज दिनांक २४ मार्च २०२५ सोमवार रोजी कारंजा टॉवर समोर बनविलेल्या हौदात पाण्याचे फवारे उडविणारी मोटर लावण्यात आली आहे. हे कार्य कारंजा टॉवरच्या परिपूर्णतेसाठी दक्ष असलेले तरुण तडफदार मिर्झा अब्दुल रऊफ बेग यांच्या देखरेखीखाली करण्यात आले. आता लवकरच पाईप लाईन मध्ये नवीन नोझल आणि रंगबिरंगी लाइट्स लावून टॉवर समोरील पाण्याचे फवारे सुरू करण्यात येणार आहे. असे असले तरी जिल्हा प्रशासनासह बीड नगर परिषद प्रशासन अजूनही ऐतिहासिक कारंजा टॉवर बद्दल ढिम्मच आहे. प्रशासनिक स्तरावर अजूनही दखल घेतली जात नाहीये. यामुळे जनतेतून नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. म्हणून ऐतिहासिक कारंजा टॉवरला परिपूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनासह बीड नगर परिषद प्रशासनाला बाध्य करेपर्यंत स्वस्थ बसणार नाही असे एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ आणि रमेशराव गंगाधरे यांनी म्हटले आहे.

============================

*एस.एम.न्युज़ च्या सेवा*

१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.

२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.

३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.

४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार) 

आसेफ़नगर, बीड.

संपर्क - *9021 02 3121*

*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*

दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत

शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत

*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत