Breaking News

एस.एम.युसूफ़ यांचा दुहेरी सत्कार; सामाजिक कार्यकर्त्यांनी मानले आभार


बीड (एस.एम.न्युज़) - शहरातील मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांचा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक रमेशराव गंगाधरे यांनी दुहेरी सत्कार केला.

एस.एम.युसूफ़ यांनी दिनांक ३१ डिसेंबर २०२४ रोजी पत्रकारिता क्षेत्रात ११ वर्ष पूर्ण केले. यामुळे गेल्या ११ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात एक मुक्तपत्रकार म्हणून देत असलेल्या योगदानाबद्दल तसेच शासनाने घेतलेल्या १०० रुपयांचा बॉण्ड बंद करून ५०० रुपयांचा बॉण्ड लागू केलेल्या निर्णयामुळे सर्वसामान्यांना बॉण्ड वापरताना आर्थिक भुर्दंड बसत होता. शिवाय ५०० रुपयाचे बॉण्ड मुद्रांक विक्रेत्याकडे मिळतही नव्हते. यामुळे एस.एम.युसूफ़ यांनी या बाबीची बातमी प्रसिद्धी माध्यमात दिली. सदरील बातमी ही दिनांक ०९ व १० डिसेंबर २०२४ रोजी अनेक स्थानिक तसेच विभागीय वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झाली होती. याची दखल शासन-प्रशासन दरबारी घेतली गेल्याने आता ५०० रुपयाचाच नाही तर १०० रुपयांचा बॉण्ड ही शासकीय-प्रशासकीय कामासहित कुठलेही प्रमाणपत्र काढण्याकरिता देण्याची गरज नसल्याचे निर्देश नोंदणी महानिरीक्षकांनी स्पष्टपणे काढल्याने सर्वसामान्यांना बसणारा आर्थिक फटका संपुष्टात आला आहे. या दोन्ही बाबींमुळे बीड शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक रमेशराव गंगाधरे यांनी एस.एम.युसूफ़ यांचा शाल, पुष्पगुच्छ देत पेढे भरवून हृदयी सत्कार करत आभार व्यक्त केले आणि पुढील कार्यासाठी मनस्वी शुभेच्छा दिल्या. यावेळी सेवानिवृत्त नायब तहसीलदार मच्छिंद्र भालेराव, ज्योतिबा नन्नवरे, बाळू कांडेकर आणि राजू पठाण यांची विशेष उपस्थिती होती.
==================================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत