राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सोमनाथ गिते सन्मानित
बीड (प्रतिनिधी) - शिवनेरी शिक्षण प्रसारक मंडळ बीड द्वारा संचलित यशवंत विद्यालय बीड येथे कार्यरत असलेले गणित विषयाचे तज्ञ शिक्षक सोमनाथ गोपीनाथ गिते यांना या वर्षीचा मातृभूमी प्रतिष्ठान बीड तर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार राष्ट्रीय युवा दिन 12 जानेवारी रोजी देण्यात आला.सरांनी आत्तापर्यंत ग्रामीण भागातील गोरगरीब ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी मोफत शिक्षण, शाळेमध्ये आर्थिक दृष्ट्या मागास मुलांसाठी स्कॉलरशिप चे वर्ग घेऊन स्कॉलरशिप पात्र मुले घडवणे, मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग असो वा शाळाबाह्य उपक्रमामध्ये जबाबदारी व मार्गदर्शन करणे.शालेय साहित्यासाठी मुले दत्तक घेणे, रक्तदान करणे, विविध सामाजिक उपक्रमामध्ये हिरी हिरी ने भाग घेणे व नाथ सावली प्रतिष्ठान बीड च्या मार्फत अनाथ मुला मुलींना शिक्षणासाठी सहकार्य करणे अशा विविध उपक्रमात शैक्षणिक व सामाजिक उत्कृष्ट काम केलेले आहे.
आतापर्यंत त्यांना विविध सामाजिक व शैक्षणिक संस्थाकडून मिळालेले पुरस्कार पुढील प्रमाणे रोटरी क्लब ऑफ बीड सेंट्रल तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार-2018,पद्मपाणी प्रतिष्ठान तर्फे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार-2019, राज्यस्तरीय यशवंत रत्न आदर्श शिक्षक पुरस्कार-2020, द स्कुल एक्सप्रेस तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार-2017, प्रो ऍक्टिव्ह एज्युकेशन लिमिटेड तर्फे बेस्ट अबॅकस टीचर अवार्ड-2022, ज़ी चॅम्प एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड तर्फे मराठवाड्यातील बेस्ट टीचर अवार्ड-2023, आणि या वर्षी मातृभूमी प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन येथे मोठ्या दिमाखात संपन्न झाला. या पुरस्कारासाठी निवड करताना प्रतिष्ठानने शिक्षकांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन पुरस्कार जाहीर करण्यात आले होते. माजी आमदार उषाताई दराडे, हभप राधाताई महाराज, हभप मोहन महाराज खरमाटे, समाजसेवक संजय कोठारी व इतर मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.यावेळी शुभेच्छा देण्यासाठी यशवंत शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते.यावेळी यशवंत विद्यालयाचे मुख्यध्यापक गणेश वाघ सर यांनी कौतुक केले. गिते सरांचा पुरस्कार मिळाल्यामुळे सर्व स्थरातून शुभेच्छा चा वर्षाव होत आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजय तांदळे हे धडपडते व्यक्तिमत्त्व, प्रा. ज्ञानेश्वर वाघ, डी. जी. तांदळे, आत्माराम वाव्हळ सर व इतर सहकाऱ्यांचीही त्यांना तेवढीच तोलामोलाची साथ. प्रतिष्ठानचे सातत्याने सामाजिक उपक्रम सुरू असतात. मातृभूमी प्रतिष्ठानच्या कौतुकाची थाप आणखीन काम करण्याची प्रेरणा देवून गेली!
==================================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा