Breaking News

उर्दूच्या अस्तित्वासाठी उर्दू लिपी लोकप्रिय झालीच पाहिजे - सय्यद हसीन अख्तर


उर्दूच्या अस्तित्वासाठी उर्दू लिपी लोकप्रिय झालीच पाहिजे - सय्यद हसीन अख्तर

मुंबई विद्यापीठ उर्दू विभाग आणि उर्दू चॅनलच्या संयुक्त विद्यमाने जश्न ए उर्दूचे भव्य उद्घाटन

मुंबई (एस.एम.न्युज़) - मुंबई विद्यापीठाचा उर्दू विभाग आणि मॅगझिन उर्दू चॅनल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जश्न ए उर्दूच्या उद्घाटन सभेला संबोधित करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बी.ओ.एस. उर्दू व फारसी विभागाचे अशासकीय सदस्य तथा तंज़ीम तरक़्क़ी उर्दू बीडचे जिल्हाध्यक्ष सय्यद हसीन अख्तर यांनी वरील उद्गार काढले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, उर्दू भाषेसाठी संघटन करणे आजच्या परिस्थितीत अत्यंत आवश्यक बनले आहे. ज्यासाठी सर्व संयोजकांचे अभिनंदन करावे लागेल. असे नाही की उर्दू भाषेला जगभर प्रेम मिळत नाही. पण उर्दू भाषेचे खरे अस्तित्व तेव्हाच असेल जेव्हा आपण सर्व उर्दू लिपी लोकांपर्यंत पोहोचवू शकू. त्यासाठी आपल्याला सोशल मीडिया चॅनल्सवर उर्दू लिपीचा प्रचार व प्रसार करावा लागेल. तेव्हाच आपण उर्दू भाषेला खऱ्या अर्थाने विकासाच्या शिखरावर नेऊ शकू. उर्दूच्या विकासासाठी आपण घरोघरी लक्ष द्यायला हवे. जे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्यांच्या पालकांना त्यांच्या घरी उर्दूतून प्रकाशित होणारी दैनिके, साप्ताहिके, पाक्षिके, मासिके आणि वार्षिक वृत्तपत्रे आपापल्या घरी लावणे  गरजेचे आहे. त्यासाठी घराघरांत असे वातावरण निर्माण करावे लागेल. उर्दु भाषेला धर्माच्या तुरुंगातून बाहेर काढून आपल्या भारतीय संस्कृतीची भाषा, सर्व शाळांना जोडणारी भाषा म्हणून समाजासमोर आणावे लागेल. विचार आणि धर्म या पद्धतीने मांडावे लागतील तरच या आपण उर्दूला मूळ स्थानावर आणू शकू. या कार्यक्रमात अहमदाबादहून महफूज हाफीज आले होते. वली अहेमद, इक्बाल हसन खान, बीना एज्युकेशन कॅम्पस, जलसा अध्यक्ष डॉ. शेख अब्दुल्ला, आयकर अधिकारी विनोद कुमार त्रिपाठी, शिक्षक संघाचे अध्यक्ष जाधव यांनीही आपल्या अनमोल शब्दांनी उपस्थितांसमोर आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी मिल्लिया महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. नासेर बागबान आणि काज़ी ज़ुबेर उपस्थित होते.
==================================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत