Breaking News

अवांतर भुर्दंडापासून नागरिकांची सुटका; एस.एम.युसूफ़ यांच्या बातमीला मोठे यश


अवांतर भुर्दंडापासून नागरिकांची सुटका

आता ५०० चाच नाही तर १०० रुपयांचा बॉण्ड सुद्धा लागणार नाही

शासकीय कामकाज, विविध प्रकारच्या प्रमाणपत्रासाठी बॉण्ड ची गरज नाही

राज्याच्या नोंदणी महानिरीक्षकांच्या सूचना व स्पष्ट निर्देश जारी

बीड (एस.एम.न्युज़) - शासनाने १००-२०० रुपयांचे बॉण्ड रद्द करून त्याऐवजी ५०० रुपयाचा बॉण्ड लागू केला होता परंतु ५०० रुपयाचे बॉण्ड हवे त्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात येत नव्हते. यामुळे नागरिकांना बॉण्ड विक्रेत्याकडून १०० रुपयांचे ०५ बॉण्ड घेऊन आपली कामे करून घ्यावी लागत होती. याकरिता त्यांना बॉण्ड विक्रेत्याकडे ५५० रुपये मोजावे लागत होते. शिवाय लिखाण कामासाठी फक्त ०१ बॉण्ड लागत असूनही त्यासोबत ०४ बॉण्ड चक्क कोरे जोडावे लागत होते. यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि मानसिक कुचंबना होत होती. ही बाब लक्षात घेऊन एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिनांक ०९ डिसेंबर २०२४ रोजी एस.एम.न्युज़ सह प्रसिद्धी माध्यमातून "मुद्रांक बाजारात ५०० च्या बॉण्डचा भयंकर तुटवडा; १०० च्या बॉण्डचा आलाय ऊत" 'शासन निर्णयामुळे १ ऐवजी घ्यावे लागताहेत ५ बॉण्ड, ५०० चे बॉण्ड मुद्रित केलेले नाही तर मग लागू कशाला केले? हे शासनाचे सुशासन की सुडासन?' या शीर्षकाने बातमी प्रसिद्धीस दिली होती. ही बातमी प्रसिद्धी माध्यमातून प्रकाशित झाली. याची शासन-प्रशासन दरबारी नोंद घेतली जाऊन ०१ महिन्याच्या आत राज्याच्या नोंदणी महानिरीक्षकांनी आता शासकीय कामकाज, विविध प्रकारच्या प्रमाणपत्रासाठी बॉण्ड ची गरज नसल्याचे पत्र काढून सूचना व स्पष्ट निर्देश जारी केले आहे. यामुळे नागरिकांना आता यापुढे बॉण्डसाठी अवांतर खर्चाचा भुर्दंड सोसावा लागणार नाही. या मुद्द्याला प्रसिद्धी माध्यमांनी प्रकाशित केल्याने हा निर्णय लागू झाल्याचे मत या मुद्द्याकडे लक्ष वेधणारे एस.एम.युसूफ़ यांनी व्यक्त केले आहे.

==================================

*एस.एम.न्युज़ च्या सेवा*

१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.

२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.

३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार) 

आसेफ़नगर, बीड.

संपर्क - *9021 02 3121*

*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*

दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत

शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत

*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत