ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणारे शिक्षक शेख अशफाक यांना द स्कूल एक्सप्रेस चा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणारे शिक्षक शेख अशफाक यांना द स्कूल एक्सप्रेस चा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
बीड (एस.एम.न्युज़) - तालुक्यातील आहेर चिंचोली येथील श्री. नारायणा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे सहशिक्षक शेख अशफाक अहेमद कय्युम यांना साप्ताहिक द स्कूल एक्सप्रेस चा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
बीड तालुक्यातील आहेर चिंचोली येथे असलेल्या श्री. नारायणा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे सहशिक्षक शेख अशफाक अहेमद कय्युम हे सन २००५ पासून सहशिक्षिक पदावर कार्यरत आहेत. गेल्या एकोणीस वर्षांच्या काळात त्यांनी आपल्या अध्यापनाने ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालकांच्या मनात आपल्या उत्कृष्ट कार्याने आदर निर्माण केला आहे. विद्यार्थी आणि शिक्षणासाठी ते आपल्याकडून सर्वतोपरी सहकार्य करतात. शिकविण्याच्या लाघवी पद्धतीमुळे ते एक विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून लोकप्रिय आहेत. शिवाय विद्यार्थ्यांना शिक्षणासह इतर उपक्रमात सहभाग घेण्याकरिताही ते नेहमी प्रोत्साहन देतात. त्यांच्या रूपात ग्रामीण भागातील शाळेला सुद्धा एक उत्कृष्ट शिक्षक मिळाल्याने ग्रामीण भागातून शहरी भागात येणाऱ्या विद्यार्थ्यांचा लोंढा थांबविण्यात त्यांना यश मिळाले आहे. त्यांच्या अशाच उत्कृष्ट कार्याची नोंद घेत शिक्षण क्षेत्रात गेल्या पंधरा वर्षांपासून मराठवाडा विभागात शिक्षणाला वाहिलेले एकमेव वृत्तपत्र म्हणून सर्व परिचित असलेल्या साप्ताहिक द स्कूल एक्सप्रेस ने त्यांना यावेळी आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा दिनांक ०५ जानेवारी २०२५ रविवार रोजी अहेमदनगर रोडवरील शासकीय विश्रामगृह समोर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक भवन, बीड येथे सकाळी ११:०० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. हा मानाचा पुरस्कार मिळाल्याने सहशिक्षक शेख अशफाक अहेमद कय्युम यांच्यावर समाजाच्या सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून पुढील कार्यासाठी सदिच्छा व्यक्त करत शुभेच्छा दिल्या जात आहेत.
==================================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा