Breaking News

आदर्श जिल्हा परिषद उर्दू माध्यमिक शाळेत आदर्श शिक्षकांचा सत्कार संपन्न

आदर्श जिल्हा परिषद उर्दू माध्यमिक शाळेत आदर्श शिक्षकांचा सत्कार संपन्न

पात्रुड (एस.एम.न्युज़) - येथील जिल्हा परिषद माध्यमिक उर्दू शाळेचे शिक्षक फारोखी खियामोदिन शफियोदिन व याच शाळेतील शिक्षिका अफशा फातेमा फुरखान सय्यद यांनी शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार नुकताच देण्यात आला आहे.
५ जानेवारी रोजी बीड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे पुरस्काराने दोघांना सन्मानित करण्यात आले आहे. फारोखी सर व अफशा फातेमा यांना बीड येथील सा.द. स्कुल एक्सप्रेस यांच्या वतीने शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच याच शाळेचे उपक्रमशील सहशिक्षक काझी मुशाहेद अजिज यांनां दिल्ली येथे राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल व फारुकी सर ,अफशा  फातेमा यांना जिल्हा स्तरावर पुरस्कराने सम्मानित करण्यात आल्याबद्दल तिघांचा पात्रुड जिल्हा परिषद माध्यमिक उर्दू शाळेच्या शालेय समितीने अध्यक्ष जुबेर मोमीन,सर्व सन्माननीय सदस्य, प्राथमिक शाळा पात्रुड शालेय समिती चे अध्यक्ष अन्सारी समियोददीन त्यांचे सर्व सदस्य, गावाचे सरपंच लतीफ मोमीन, माजी उपसरपंच शेख युसूफ़, इसा मोमीन, मौलाना अनिस, हाफीज रमजान, रियाज सय्यद, फिरोझ शेख, खाजा मोईन, जब्बार, मोइज, गावातील नागरिक, मुख्याध्यापिका अतहर फातेमा, सर्व शिक्षक व शिक्षिकेत्तर कर्मचारी आणि परिवाराकडून तिघांवर अभिनंदनचा वर्षाव करण्यात आला.
==================================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत