Breaking News

बीड शहरातील मूलभूत नागरी सुविधा सुरळीत करा - रूपाली देशपांडे


बीड शहरातील मूलभूत नागरी सुविधा सुरळीत करा - रूपाली देशपांडे 

बीड (एस.एम.न्युज़) - शहरात कचऱ्याची समस्या तुडुंब भरलेले नाले व नाल्या गलिच्छता पाणीपुरवठा आणि विद्युत पुरवठा विषयी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या तथा लेखिका रूपाली देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने बीड नगर परिषद आणि जिल्हाधिकारी यांना भेटून विविध मागण्यांचे निवेदन दिले.
याविषयी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, बीड शहरातील समस्या बाबतीत तातडीने उपाययोजना करण्यात यावी. उघड्यावरील कचरा व तुंबलेल्या नाल्यांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात असुन तातडीने उपाययोजना करण्यात यावी. बीड शहरातील गल्लोगल्ली तसेच चौकाचौकात कचऱ्यांचे ढीग अस्ताव्यस्त पसरलेल्या अवस्थेत आहेत. कचरा नेण्यासाठी घंटागाडी नियमित येत नाही. गल्लोगल्ली कचराकुंडी नाही. तसेच नाल्यांमध्ये प्लास्टिक पिशव्या, रिकाम्या बाटल्या, कचरा अडकल्याने त्या तुंबलेल्या अवस्थेत असुन नालीतील घाण व पाण्यामुळे दुर्गंधी पसरलेली आहे. यामुळे रोगराई पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे. यावर तातडीने उपाययोजना करण्यात यावी. बीड शहरातील मुख्य रस्ते तसेच  गल्लोगल्ली असणारे पथदिवे बंद असुन शोभेची वस्तू बनले आहेत. रात्रीच्या वेळी अंधार असल्याने अपघाताच्या तसेच चोरीच्या घटनेत वाढ झाली असुन तातडीने बंद अवस्थेतील पथदिवे सुरू करण्यात यावेत. बीड शहरातील नागरिकांना नियमित पाणी पुरवठा होत नसल्याने त्यांचे हाल होत असुन जिवनावश्यक वस्तू असलेल्या पाण्याची टंचाई भासू नये यासाठी नगर परिषद प्रशासनाने नियमित पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी. नागरिकांचे दैनंदिन जीवन सुरळीत व्हावे याकरिता अशा या मागण्यांवर लक्ष देऊन ताबडतोब आवश्यक ती कामे करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनानंतरही जर शहराची अवस्था सुधारण्यात आली नाही तर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशाराही देण्यात आला आहे. शिष्टमंडळात रूपाली देशपांडे यांच्यासह मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़,  डॉ. गणेश ढवळे लिंबागणेश कर, शेख युनूस चऱ्हाटकर, सोनल पाटील, माजी सैनिक अशोक येडे, रामधन जमाले, सचिन शहागडकर, सुधाकर देशमुख, सुरेखा कदम, रेणुका डांगे, आरती परळकर  यांच्यासह अनेकांचा समावेश होता.

*जिल्हाधिकारी पाठक यांनी दिले आश्वासन*

जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना भेटल्यानंतर रूपाली देशपांडे यांनी शहरात असलेल्या सर्व नागरी समस्यांचे कथन केले. यावर पाठक यांनी सर्व ऐकून घेतले तसेच निवेदन वाचून आश्वासित केले की, लवकरच बीड शहरासाठी स्वतंत्र अधिकाऱ्याची नेमणूक करून सर्व प्रश्न हाताळून सर्व समस्या दूर करण्याचा प्रयत्न करतो.
==================================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत