Breaking News

बीड जिल्ह्याधिकारी अविनाश पाठक यांच्या सरपंच पद रद्द आदेशाला उच्च न्यायालयाची स्थगिती


बीड (एस.एम.न्युज़) - जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याने दिनांक २० जानेवारी २०२५ रोजी बीड जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी जिल्ह्यातील सात तालुक्यातील १३ सरपंच व ४१८ सदस्यांचे सदस्य रद्द केल्यानंतर माजलगाव तालुक्यातील खरात-आडगाव येथील सरपंच श्रीमती अनुसया मधुकर आढाव यांनी सदरील आदेशाला उच्च न्यायालयात आवाहन दिल्यानंतर उच्च न्यायालयाने सदरील आदेशाला स्थगिती दिली आहे. अशी माहिती पांडुरंग नागरगोजे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केली आहे.

याविषयी सविस्तर वृत्त असे की, सन २०२२ ग्रामपंचायत खरात आडगाव ता.माजलगाव  गावची ग्रामपंचायत निवडणूक पार पडली होती. सदरील निवडणुकीमध्ये जनतेतून निवडून आलेल्या सरपंच श्रीमती अनुसया मधुकर आढाव या मागास प्रवर्ग (महिला) या प्रवर्गातून सरपंचपदी निवडून आल्या आहेत. तसेच निवडणुकीमध्ये त्या नागरिकांच्या मागास प्रवर्गातील असल्याने त्यांनी त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र हे जुलै २०२३ रोजीच दाखल केलेले आहे.
        तरीही बीड जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी सदरील महिलेचे सरपंच पद रद्द केले होते. यामुळे त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ॲड. संदीप रामनाथ आंधळे यांच्या मार्फत दिवाणी याचिका दाखल करून सदरील आदेशाला आवाहन दिले होते. सदरच्या याचिकेची सुनावणी न्यायमूर्ती के.सी. संत यांच्यासमोर झाली. सुनावणी दरम्यान याचिकाकर्त्यांचे वकील ॲड. संदीप आंधळे यांनी न्यायालयाच्या  निदर्शनास आणून दिले की, सरपंचपदी निवडून आल्यानंतर याचिकाकर्त्यांनी  जात वैधता प्रमाणपत्र तहसील कार्यालय माजलगाव येथे  दाखल केलेले होते. तरीही जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी कोणतीही शहानिशा न करता, कोणतीही नोटीस न देता, याचिकाकर्त्यांचे म्हणने न ऐकता, याचिकाकर्त्यांचे  सरपंच पद रद्द केले होते. ते  नैसर्गिक न्याय तत्वाला अनुसरून नव्हते. यामुळे न्यायमूर्तींनी दिनांक १० जुलै २०२३ रोजीच्या महाराष्ट्र शासनाने काढलेला अध्यादेश क्रमांक ६ च्या आधारे सदरील  जात वैधता प्रमाणपत्र हे दाखल केलेले दिसून येते. यामुळे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी काढलेल्या सदरील सरपंचाच्या निलंबनाच्या आदेशास न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या प्रकरणात याचिकाकर्त्याच्या वतीने ॲड. संदिप आंधळे यांनी काम पाहिले. तर ॲड. सागर मडके यांनी त्यांना सहकार्य केले. अशी माहिती पांडुरंग नागरगोजे यांनी दिलेल्या पत्रकात नमूद केली आहे.
==================================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत