२४ जानेवारी रोजी मोठ्या संख्येने उपस्थित रहा - रूपाली देशपांडे
बीड (एस.एम.न्युज़) - शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या तथा लेखिका रूपाली देशपांडे यांनी बीड शहर स्वच्छतेकरिता बीड नगरपरिषद प्रशासनासह जिल्हा प्रशासनाला भेटून निवेदन देण्याचे ठरविले आहे. याकरिता शहर स्वच्छतेची तळमळ असणाऱ्या समविचारी नागरिकांनी दिनांक २४ जानेवारी २०२५ शुक्रवार रोजी बीड नगर परिषद येथे एकत्र यावे तिथे मुख्याधिकारी यांना निवेदन दिल्यानंतर सर्वांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवेदन देण्यात येणार आहे. तरी सर्वांनी निवेदन द्यायला यावे असे आवाहन करण्यात आले आहे.
याविषयी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, बीड शहर स्वच्छतेसाठी सर्व संघटना, विविध सामाजिक संस्था आणि शहरातील महिला/पुरुषांनी एकत्र यावे. काही दिवसांपूर्वी बीड शहर स्वच्छेतेसाठी मुख्याधिकारी नीता अंधारे यांना भेटण्यासाठी गेल्यावर त्या काही भेटल्या नाहीत. म्हणून आता दिनांक २४ जानेवारी २०२५ शुक्रवार रोजी दुपारी ०१:००, वा परत एकदा निवेदन दिले जाणार आहे. बीड शहरातील प्रत्येक कॉलनीत, प्रत्येक गल्लीत एक कचरा कुंडी पाहिजे. विद्युत खांबावर लाईट ची व्यवस्था पाहिजे. बीड शहराला चार दिवसाआड नळांना पाणी सोडायला हवे. इत्यादी मागण्याचे निवेदन देणार आहे. म्हणून सर्वांना विनंती आहे की, शहर स्वच्छतेसाठी या कामात साथ द्या. एक तिच्या बाळाला नक्कीच चांगले फळ मिळते. बीड शहराच्या स्वच्छते करिता आपण सर्वजण मिळून करूया. म्हणून महिला, पुरूषांसह सर्व सामाजिक संघटना एकत्र आल्यास चांगले कामे होईल आहे. म्हणून तुम्हा सर्वांचे येणे आवश्यक आहे. याकरिता दिनांक २४ जानेवारी रोजी दुपारी ठीक ०१:०० वा सर्वांनी मिळून प्रथम बीड नगर परिषद व नंतर जिल्हाधिकारी कार्यालयात एकत्र यावे असे आवाहन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या तथा लेखिका रुपाली देशपांडे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून केले आहे.
==================================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा