Breaking News

सय्यद हारून सिद्दीकी, सय्यद अमानउल्लाह यांची निवड


सय्यद हारून सिद्दीकी, सय्यद अमानउल्लाह यांची निवड  

बीड (एस.एम.न्युज़) - महाराष्ट्र बॉडी बिल्डींग असो. मुंबई व इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशन मान्यतेने व न्यु कोल्हापूर डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डींग असोसिएशन आणि आदित्य भोसले युवा मंच यांच्या संयु्क्त विद्यमाने ज्युनिअर महाराष्ट्र श्री २०२५ व मास्टर्स आणि दिव्यांग राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा दिनांक २६ जानेवारी २०२५ रोजी राजाराम पूरी लेन न.५ बस रूट कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आली आहे. या अनुषंगाने बीड जिल्ह्याची शरीर सौष्ठव संघ निवड चाचणी स्पर्धा दिनांक १९ जानेवारी २०२५ रविवार रोजी सायंकाळी ६:३० वाजता मराठवाडा बॉडी बिल्डर्स असोसिएशन लाईफ हेल्थ कल्ब, लाईफ स्टाईल जिम, महात्मा फुले शॉपींग सेंटर, नवी भाजी मंडई, बीड येथे दैनिक पार्श्वभूमी चे संपादक गंमत भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या स्पर्धेतून मास्टर्स बॉडीबिल्डिंग ५५ ते ६० वर्ष वयोगटात  सय्यद हारून शब्बीर हुसेन सिद्दीकी तर प्रशिक्षक सय्यद अमानउल्लाह यांची निवड एमबीबीए, आयबीबीएफ च्या नियमानुसार करण्यात आली आहे. हि स्पर्धा मराठवाडा बॉडी बिल्डर्स असोसिएशन चे सचिव डॉ. सय्यद अरशियानउल्लाह मिसबाहउल्लाह यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. या स्पर्धेसाठी दैनिक पार्श्वभूमीचे प्रतिनिधी पांडुरंग सुगडे, जिल्ह्याचे शरीर सौष्ठव खेळाडू, जिम चालक मालक, ट्रेनर्स मंडळी उपस्थित होती. सय्यद हारून सिद्दीकी यांना स्पर्धेच्या यशासाठी मराठवाडा बॉडी बिल्डर्स असोसिएशन चे कार्याध्यक्ष आमदार विजयसिंह  पंडित, जिल्हा बॉडी बिल्डिंग असोसिएशन चे अध्यक्ष डॉ. योगेश क्षीरसागर, ॲड. शेख शफिक भाऊ, अविनाश नाईकवाडे, विक्रांत हजारी, डॉ. सय्यद मसीह यांनी शुभेच्छा दिल्या.

==================================

*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत