बीड नगर परिषदेला रूपाली देशपांडे यांनी दिलं संक्रांतीचं अनोखं वाण
बीड नगर परिषदेला रूपाली देशपांडे यांनी दिलं संक्रांतीचं अनोखं वाण
शहर स्वच्छतेसाठी खराटे आणि टोपले भेट
बीड (एस.एम.न्युज़) - शहर स्वच्छतेसाठी लेखिका रूपाली देशपांडे यांनी बीड नगर परिषदेला संक्रांतीची भेट म्हणून खराटे आणि टोपले वाण दिले. बीड नगर परिषद परिसरात याची जोरदार चर्चा होत आहे.
याविषयी बोलताना रूपाली देशपांडे म्हणाल्या की, सध्या बीड शहराची अवस्था ही अक्षरशः एखाद्या उकिरड्यासारखी झालेली आहे. संपूर्ण शहरात कुठेही जाऊन पाहिलं असता जिथे तिथे जागोजागी घाणच घाण, कचराच कचरा, गलिच्छता दिसून येत आहे. मग कोणा कोपरा असो की मुख्य रस्ते, सगळीकडे घाण आणि कचरा दिसत आहे. मोठे नाले असो की लहान नाल्या त्याही अगदी तुडुंब भरलेल्या दिसतात. चार-सहा महिन्यांतून लहान नाल्या साफ केल्यातर नालीतून काढलेली घाण आठ-आठ, दहा-दहा दिवस उचलली जात नाही. ती तशीच रस्त्यांवर पडून राहते. मोठे नाले तर वर्षानुवर्षे काढले जात नाही. ही अवस्था पाहता बीड नगर परिषदेत स्वच्छता विभाग अस्तित्वात आहे की नाही? शहर स्वच्छतेसाठी आवश्यक संख्येत मनुष्यबळ आहे की नाही? स्वच्छते करिता लागणारी यंत्रसामग्री आहे की नाही? असे अनेक प्रश्न आम्हा बीड शहरवासीयांच्या मनात उत्पन्न होतात. बीड नगर परिषदेकडे मनुष्यबळ कमी असेल तर तो बीड शहराचे नागरिक म्हणून आम्ही वाढवू तर शकत नाही परंतु आमच्याकडून बीड नगर परिषदेला काही सामग्री देऊ शकतो. म्हणून सक्रांती सणाच्या निमित्ताने वाण म्हणून स्वच्छतेकरिता लागणारे खराटे आणि टोपले सप्रेम भेट म्हणून दिले आहे. प्रत्यक्षात मुख्याधिकारी अंधारे मॅडम यांना भेटूनच द्यायचे होते. याकरिता गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्याशी संपर्क साधून भेट देण्याचे सांगत होते परंतु मॅडमची भेट काही होऊ शकली नाही म्हणून खराटे आणि टोपले बीड नगर परिषदेतील त्यांच्या कार्यालयाच्या दारात ठेवले असे मनोगत रूपाली देशपांडे यांनी बोलताना व्यक्त केले.
==================================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा