Breaking News

मास्टर माईंड किड्स अबॅकस क्लासेसची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यशस्वी घोडदौड उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यी व शिक्षकांचा सत्कार


बीड (एस.एम.न्युज़) - शहरातील ज़मज़म कॉलनी येथे असलेल्या मास्टर माईंड किड्स अबॅकस क्लासेस च्या विद्यार्थ्यांनी यावर्षी पुणे येथे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उज्वल यश प्राप्त करून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आपली यशस्वी घोडदौड सुरू ठेवली आहे. यामुळे या स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांसह क्लासेसच्या शिक्षकांचाही सत्कार समारंभ सोहळा नुकताच ज़मज़म कॉलनी येथे घेण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीड पंचायत समितीचे बीडीओ अनिरुद्र सानप होते तर प्रमुख पाहुणे म्हणून एआयएमआयएम पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष ॲड. शेख शफीक भाऊ, सा. द स्कूल एक्सप्रेस चे संपादक शेख एजाज़ सर, उर्दू शिक्षक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शाहिद कादरी सर, अज़ीज़ राजा सर, ताजुद्दीन सर हे होते.
सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाची सुरुवात पवित्र क़ुरआन पठणने करण्यात आली. सिद्दिकी उनैस मोईज़ यांनी क़ुरआन पठण केले तर कार्यक्रमाचे प्रस्ताविक क्लासेसच्या संचालिका मोमीन मुस्कान सलमान यांनी केले.
या कार्यक्रमात राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत जाऊन यश मिळविलेल्या माज़ अब्दुल खुद्दुस, शैजान खान शहेबाज खान, सिद्दिकी मुहम्मद उनैस (पाथरी, जि. परभणी हिने अबॅकस चे ऑनलाइन शिक्षण घेऊन तिसऱ्यांदा बक्षीस मिळविले आहे. आऊट ऑफ सिटी मुंबई-पाथरी), शेख जुनैरा रफ़ीक़ुर्रहमान, शेख रक्षंदा अखील यांना ट्रॉफी व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच शेख माज़ खाजा पाशा आणि मोमीन इज़हार मज़हर या दोघांनी दोन वर्षाची डिग्री पूर्ण करून पुणे येथील स्पर्धेत विशेष पुरस्कार मिळविले आहेत. याशिवाय ए कॅटेगिरी मध्ये शेख मुहम्मद जोहानुर्रहमान हा पहिला आला असून शेख मारीया ही द्वितीय आली आहे. या सर्व विद्यार्थ्यांनाही या कार्यक्रमात ट्रॉफी आणि सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच मास्टर माईंड किड्स अबॅकस क्लासेस च्या जुबेरी फिरदोस फयाज़ोद्दीन मॅम, शेख आयेशा मॅम आणि ज़ुबेरी मुज़म्मिल सरांना सुद्धा कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी आणि सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोमीन बिलाल सर मोमीन सलमान सर आणि जुबेरी सर यांनी विशेष परिश्रम घेतले.
तत्पूर्वी पुणे येथे पार पडलेल्या या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थी पुणे येथील लोहेगाव परिसरात असलेल्या गीताई लॉन्स येथे अरब देश, दक्षिण आफ्रिका, जकार्ता, हॉलंड यासह अनेक देशातून आले होते. अशा मोठ्या स्पर्धेत मास्टर माईंड किड्स अबॅकस क्लासेस च्या विद्यार्थ्यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही उज्वल यश मिळविले आहे.
==================================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत