Breaking News

३७ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर उपशिक्षणाधिकारी काज़ी माजेद सेवानिवृत्त


 ३७ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर उपशिक्षणाधिकारी काज़ी माजेद सेवानिवृत्त

बीड (एस.एम.न्युज़) - जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या योजना विभागातील उपशिक्षणाधिकारी काज़ी माजेद हे नियत वयोमानानुसार दिनांक ३१ डिसेंबर २०२४ मंगळवार रोजी सेवानिवृत्त झाले. यानिमित्ताने त्यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्याचा कार्यक्रम लॉर्ड बेडन पॉवेल सभागृहात ठेवण्यात आला होता. यावेळी बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांसह सर्व अधिकाऱ्यांनी तसेच शिक्षक व मुख्याध्यापकांनी त्यांचा सहपत्नीक यथोचित सत्कार केला. तसेच सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी त्यांना उत्तम आरोग्य लाभो अशा सदिच्छा व्यक्त करत शुभेच्छा दिल्या. त्यांच्या सत्कार समारंभात मुहम्मद इस्हाक़, काझी मुशाहेद, मोमीन अलीमोद्दीन, मोमीन नजीब, मिर्झा हसनात, मोमीन मुजम्मील, शेख रिज़वान, नजीब सौदागर यांनी विशेष सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
==================================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत