Breaking News

माजलगाव जि.प.शाळेची आदर्श जि.प.मा.शाळा पात्रूडला भेट पात्रुड शरीफ दर्गाह आणि निसर्ग सहल संपन्न


माजलगाव (एस.एम.न्युज़) - येथील जिल्हा परिषद शाळेने तालुक्यातील पात्रुड गावाच्या आदर्श जिल्हा परिषद माध्यमिक शाळेला भेट दिली. सोबतच पात्रुड शरीफ येथील दर्गाह हजरत मखदूम शाह वली तसेच निसर्ग सहल उत्साहात पार पडली.

विद्यार्थ्यांना शिक्षणासह इतर उपक्रमातही रस आणि आनंद घेता यावा. त्यांच्या ज्ञानात भर पडावी याकरिता माजलगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा नंबर एक ने शाळेची सहल काढली होती. ही सहल पात्रुड या गावात असलेल्या आणि आदर्श शाळा म्हणून लौकिक मिळविलेल्या जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळेला भेट देऊन तेथील विविध लॅब ची माहिती विद्यार्थ्यांना दिली. यावेळी आदर्श जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पात्रूड च्या मुख्याध्यापिका अतहर फातिमा, अफशाबाजी, जुलेखा बाजी, महेवीश बाजी, तय्यब सर, गौस सर, जमील सर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले तसेच माजलगाव जिल्हा परिषद प्राथमिक नंबर एक उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिका सिद्दीकी कौसरबाजी यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील शिक्षक पठाण खाजा खान सर, सिद्दिकी अबूबकर सर, मोमीन साजेदाबाजी, शेख सना अंजुम बाजी, रुबीना बाजी, गुलनाज बाजी, यावर सर, समीनाबाजी यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शाळेच्या भेटीनंतर ही सहल पात्रुड गावात असलेल्या हजरत मखदूम शहावली यांच्या दर्गाहात गेली आणि निसर्गरम्य वातावरणात ही सहल पार पडली. यावेळी सहलीत समाविष्ट असलेल्या विद्यार्थ्यांनी दोन्ही शाळेतील शिक्षकांच्या अमूल्य मार्गदर्शनाचा ठेवा आपल्या मन मस्तिष्क मध्ये साठवून ठेवला आणि निसर्ग सहलीचा मनसोक्त आनंद लुटला.
==================================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत