Breaking News

हाजी अब्दुल सत्तार तांबोळी यांचे निधन सकाळी १० वाजता नमाज़ ए जनाज़ा व तद्फ़ीन

बीड (एस.एम.न्युज़) - शहरातील पानाचे प्रसिद्ध व्यापारी हाजी अब्दुल सत्तार तांबोळी यांचे वृद्धापकाळाने रात्री १०:०० वाजता निधन झाले. त्यांची नमाज़ ए जनाज़ा दिनांक ०२ जानेवारी २०२५ गुरुवार रोजी सकाळी १०:०० वाजता तकिया मस्जिद येथे पठण करण्यात येणार असून तद्फ़ीन तकिया कब्रस्तान येथे करण्यात येणार आहे.
हाजी अब्दुल सत्तार तांबोळी यांनी बीड शहरातील ऐतिहासिक कारंजा टावर जवळ असलेल्या कारंजा मस्जिद येथे अनेक वर्षे पानाची दुकान चालविली. संपूर्ण बीड जिल्ह्यात त्यांची ओळख पान विक्रेत्यासह पान दुकानावर लागणाऱ्या अनेक साहित्यांचे विक्रेते म्हणून होती. बीड शहरात त्यांनी अक्षरशः शून्यातून विश्व निर्माण केले होते. दिनांक ०१ जानेवारी २०२५ रोजी रात्री १०:०० वाजता वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांची वृद्धापकाळाने प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. बीड शहरातील बुंदलपुरा भागात असलेल्या सुप्रसिद्ध सॉफ्टटेक कॉम्प्युटरचे संचालक रफिक तांबोळी यांचे ते वडील होते. तांबोळी कुटुंबीयांच्या दुःखात एस.एम.न्युज़ परिवार सहभागी आहे.
==================================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.


*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत