Breaking News

बीबी हाजेरा यांना द स्कूल एक्सप्रेस चा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर


बीड (प्रतिनिधी) - शहरातील प्रसिद्ध मिल्लिया प्राथमिक शाळेच्या (मुलींची) सहशिक्षिका बीबी हाजेरा शेख साजेद यांना साप्ताहिक द स्कूल एक्सप्रेस चा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 

बीड शहरातील मिल्लिया प्राथमिक शाळा (मुलींची), भालदारपुरा येथे बीबी हाजेरा शेख साजेद या सन २०१९ पासून सहशिक्षिका पदावर कार्यरत आहेत. गेल्या पाच वर्षांच्या अल्पकाळातच त्यांनी आपल्या अध्यापनाने विद्यार्थी व पालकांच्या मनात आपली एक स्वतंत्र जागा निर्माण केली आहे. विद्यार्थी आणि शिक्षणासाठी त्या आपल्याकडून सर्वतोपरी सहकार्य करतात. शिकविण्याच्या लाघवी पद्धतीमुळे त्या एक विद्यार्थी प्रिय शिक्षिका म्हणून अल्पावधीतच लोकप्रिय झाल्या आहेत. शिवाय विद्यार्थ्यांना शिक्षणासह इतर उपक्रमातही सहभाग घेण्याकरिता त्या नेहमी प्रोत्साहन देतात. त्यांच्या अशाच उत्कृष्ट कार्याची नोंद घेत शिक्षण क्षेत्रात गेल्या पंधरा वर्षांपासून मराठवाडा विभागात शिक्षणाला वाहिलेले एकमेव वृत्तपत्र म्हणून सर्व परिचित असलेल्या साप्ताहिक द स्कूल एक्सप्रेस ने त्यांची यावेळी देण्यात येणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड केली आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा येत्या दिनांक ०५ जानेवारी २०२५ रविवार रोजी अहेमदनगर रोडवरील शासकीय विश्रामगृह समोर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक भवन, बीड येथे सकाळी ११:०० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. मानाच्या या पुरस्कारासाठी सहशिक्षिका बीबी हाजेरा शेख साजेद यांची निवड झाल्याने त्यांच्यावर समाजाच्या सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून पुढील कार्यासाठी सदिच्छा व्यक्त करत शुभेच्छा दिल्या जात आहेत.

==================================

*एस.एम.न्युज़ च्या सेवा*

१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.

२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.

३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार) 

आसेफ़नगर, बीड.

संपर्क - *9021 02 3121*

*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*

दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत

शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत

*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत