जिल्हाधिकारी यांच्याकडे पेपर कप वर बंदी घालण्याची मागणी नागरिकांनो, पेपर कपमध्ये चहा,कॉफी,दुध पिऊ नका - जे.डी.शाह
बीड (एस.एम.न्युज़) - डिस्पोजेबल पेपर कपमध्ये चहा किंवा कॉफीसारखी गरम पेये पिणे सामान्य गोष्ट आहे. पण काही लोक असा दावा करतात की, “असे केल्याने मायक्रोप्लास्टिक कण पोटात जाऊ शकतात, जे आरोग्यासाठी धोकादायक आहे. अलीकडेच, महाराष्ट्रातील बुलढाणा शहरात व जिल्ह्यात जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी पेपर कपवर बंदी घालण्याचे निर्देश दिले. आदेशित केल्यावर त्यांनी दावा केला की, “पेपर कप हे कर्करोगाच्या वाढत्या घटनांमागील मुख्य कारण आहे. यामुळे बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पेपर कपाचा वापर होत असल्याने सर्वसामान्य जनतेला कर्करोगा पासून सुरक्षित ठेवण्यासाठी बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा आधार घेऊन बीड जिल्ह्यात पेपर कपाच्या वापरावर तात्काळ बंदी घालावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जे.डी.शाह यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील पेपर कपमध्ये चहा-कॉफी पिणे सुरक्षित आहे का हे वादविवाद सुरू असताना याबाबत द इंडियन एक्स्प्रेसमध्ये मिरारोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटल्स ऑन्कोसर्जन, सल्लागार डॉ. तीर्थराज कौशिक यांनी सांगितले की, “कपचा कर्करोगाशी थेट संबंध नसला तरी कप तयार करण्यासाठी वापरण्यात आलेली रसायने जसे की, मायक्रोप्लास्टिक्स किंवा परफ्लुरोआल्काइल पदार्थ ( पीएफएएस) यामुळे कर्करोग होऊ शकतो.
मायक्रोप्लास्टिक्स हे प्लास्टिकपासून बनवलेले सूक्ष्म कण आहेत, जे आपल्या नैसर्गिक वातावरणात अडकले आहेत. मानवाच्या जैविक परिसंस्थेशी त्यांचा परस्पर संवाद यावर संशोधन सुरू असुन नवी दिल्ली द्वारका येथील मणिपाल हॉस्पिटल, मेडिकल ऑन्कोलॉजी सल्लागार डॉ. मृदुल मल्होत्रा यांनी द इंडियन एक्स्प्रेसला सांगितले.
रासायनिक रचना दूषित : मायक्रोप्लास्टिक्स मानवी शरीरातील ऊतींमध्ये कार्सिनोजेन असलेली रसायने वाहून आणि वितरीत (कारी अँड डेलिवेर) करू शकतात.
दाहकता मायक्रोप्लास्टिक्स सेल्युलर बदलांना प्रेरित करू शकतात, ज्यामुळे शरीरात कर्करोग होऊ शकतो.
श्लेष्माच्या थरात व्यत्यय आणणे : मायक्रोप्लास्टिक्स श्लेष्माच्या थराला, विशेषतः गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्टमध्ये व्यत्यय आणू शकतात आणि मानवी शरीराच्या संरक्षणात्मक अडथळ्यांशी तडजोड करू शकतात.
हे देखील सत्य आहे की, जेव्हा पेपर कपमध्ये कोणतेही गरम पेय दिले जाते तेव्हा काही पदार्थ पेयामध्ये शोषले जाऊ शकतात, ज्यामुळे दीर्घकाळापर्यंत एखाद्याच्या आरोग्यावर परिणाम होईल अशी चिंता निर्माण होऊ शकते, असे प्रतिपादन डॉ. कौशिक यांचा अहवाल लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, वर्तमान संशोधनाने निश्चितपणे सिद्ध केलेले आहे की, “पेपर कपच्या अधूनमधून वापरामुळे कर्करोग होतो. या दाव्याचे समर्थन करण्यासाठी कोणताही पुरावा उपलब्ध नाही,” असेही डॉ. कौशिक यांनी स्पष्ट केले असले तरी ऑगस्ट २०२४ च्या अभ्यासाचा दाखला देत डॉ. मल्होत्रा म्हणाले की, “प्लास्टिक-लेपित पेपर कपमध्ये गरम द्रवपदार्थ फक्त १५ मिनिटांसाठी ठेवल्यास अंदाजे २५,००० लहान प्लास्टिकचे कण बाहेर पडू शकतात. डॉक्टर मल्होत्रा यांच्या मते ज्या व्यक्ती त्यांच्या दैनंदिन जीवनात जवळपास तीन कप गरम पेये पितात, त्यांच्या शरीरात जवळपास ७५,००० अदृश्य प्लास्टिकचे कण प्रवेश करू शकतात.
पेपर कपच्या फायद्याबाबत बोलायचे झाल्यास ते वापरण्यास सोयीस्कर आणि हलके डिझाइन आहे आणि तोटा म्हणजे पेपर कपमध्ये रसायने असू शकतात, जी एकदा वापरल्या जाणाऱ्या कचऱ्यापासून पर्यावरणाची चिंता वाढवू शकतात. यामुळे बीड जिल्ह्यातील सर्व सामान्य जनतेला सुरक्षित ठेवण्यासाठी अशा घातक परिणाम करणारे पेपर कपाच्या वापरावर तात्काळ बंदी घालुन कर्करोगा पासून सुरक्षित ठेवण्यासाठी बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा आधार घेऊन बीड जिल्ह्यात पेपर कपाच्या वापरावर बंदी घालावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जे.डी.शाह यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी बीड यांच्याकडे केली आहे.
==================================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा