Breaking News

*मुक्त पत्रकारिता तप वर्षात*


*मुक्त पत्रकारिता तप वर्षात*

दिनांक ३० डिसेंबर २०१३ हा तो दिवस आहे, ज्या दिवशी माझ्या हातून लिहिलेला पहिला लेख प्रकाशित झाला होता. याला ३० डिसेंबर २०२४ रोजी याला ११ वर्षे पूर्ण झाली आहेत आणि आता २०२५ साली बारावं वर्ष सुरू झालं आहे. १२ वर्ष म्हणजे एक तप. पाण्याच्या बुडबुड्या सारख्या असलेल्या पत्रकारिता क्षेत्रात एक मुक्त पत्रकार म्हणून सातत्याने ११ वर्षे लिखाण करणे आणि ते स्थानिक वृत्तपत्रांसह विभागीय वृत्तपत्रात प्रकाशित होणे हे निश्चितच सोपे नाही. माय मराठीची सतत साधना, लिखाणाची तपश्चर्या आणि याला सर्वच वृत्तपत्राचे संपादक, कार्यकारी संपादक, उपसंपादक, विभागीय वृत्तपत्रांचे जिल्हा प्रतिनिधी, संगणक तज्ञ, छायाचित्रकार या सर्वांचेच मिळालेले सहकार्य आणि प्रेम.  यामुळे वृत्तपत्र क्षेत्रात लिखाण करताना ११ वर्षे कशी सरली ते कळालेच नाही. आजही जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा असे वाटते की, नुकतेच लिखाण सुरू केले आहे. माझ्या लिखाणाला एवढे ताजेतवाने ठेवण्याकरिता सर्वांनी दिलेली साथ आणि वाचकांचे मिळत असलेले प्रेम याबद्दल जेवढे ऋण व्यक्त करावे, जेवढे आभार मानावे तेवढे थोडेच आहे. मुक्त पत्रकारितेच्या तप वर्षात पदार्पण करताना थोडेसे माझ्या मनातले या लेखाच्या माध्यमातून आपणा सर्वांसमोर मांडत आहे.

सन २०१३ साली मी प्रथम २७ डिसेंबरला एक लेख लिहिला होता. हा लेख संक्षिप्त करून बातमी रूपात दैनिक पार्श्वभूमी मध्ये दिनांक ३० डिसेंबर २०१३ रोजी प्रकाशित झाला होता. तेव्हापासून जी लेखणी उचलली ती आजपर्यंत ही खाली ठेवलेली नाही. म्हणूनच गेल्या अकरा वर्षात आतापर्यंत शेकडोच नाही तर हजारो बातम्या लिहिण्याची संधी मिळाली. याशिवाय शंभर सव्वाशे लेख सुद्धा लिहिता झालो. त्यातही ऐतिहासिक कारंजा टावर च्या दुर्दशेबद्दल त्याचे नूतनीकरण व्हावे म्हणून लिहिलेला 'बीड नगरपालिका मी कारंजा टावर बोलतोय!' हा लेख जेव्हा दैनिक पार्श्वभूमी मध्ये ठळकपणे चांगली मोठी जागा देऊन प्रकाशित करण्यात आला आणि त्यावर काही दिवसातच अंमलबजावणी होऊन ऐतिहासिक कारंजा टावरचे नूतनीकरण करण्यात आले, तेव्हापासून वाचकांच्या मनात एस.एम.युसूफ़ या नावाने कायमचे घर केले. या लेखाबद्दल बोलताना तर काहीजण आजही म्हणतात की, कारंजा टॉवरला सुद्धा बोलता करणारा पत्रकार आमच्या बीड शहरात आहे. आज जर कधी दहा पंधरा दिवस वृत्तपत्रांना बातमी दिली नाही तर अनेक वाचक फोन करून किंवा व्हाट्सअप ला मेसेज टाकून प्रश्न करतात. कुठे आहात? गेल्या अनेक दिवसांपासून तुमचं लिखाण वाचनात आलं नाही. शिवाय वृत्तपत्र क्षेत्रातील अनेक हितचिंतक सुद्धा विचारतात. सर्वांकडून मिळत असलेले हे प्रेम अत्यंत अमूल्य आहे आणि ते सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी कठोर साधना आणि तपस्या करण्याची तयारी ठेवावी लागते. ती काही प्रमाणात बहुतेक माझ्याकडून होतेयं म्हणूनच की काय सर्वांचे प्रेम आणि आपुलकी मिळते.

समाजात वावरताना नजरेस येणारे मुद्दे मनाच्या गाभाऱ्यातून बुद्धीच्या कसोटीवर ताऊन-सुलाखून लेखणीच्या माध्यमातून समाजासमोर आणल्यानंतर शासन-प्रशासन दरबारी जेव्हा त्यावर कार्य होतात तेव्हा मनस्वी आनंद होतो. कारण आपण समाजात जन्माला आलो तर समाजाचे काही देणे लागतो, या भावनेतून सातत्याने वेगवेगळे प्रश्न लेखणीच्या माध्यमातून मांडण्याचे बळ मिळते. याला लोकशाहीत चौथा आधारस्तंभ म्हटल्या जाणाऱ्या पत्रकारिता क्षेत्रातील सर्व वृत्तपत्रे आणि संपादकांची पुरेपूर साथ मिळते. त्यातल्या त्यात आपला बीड जिल्हा हा सतत पुरोगामी विचारसरणीचा राहिलेला आहे म्हणूनच आपल्या बीड जिल्ह्यातील वृत्तपत्रे आणि संपादक चांगल्या लिखाणाला नेहमी वाव देतात. समाज हितासाठी लिहून देण्यात येत असलेल्या बातम्या असो की लेख असो, ते प्रसिद्ध करण्यात कुचराई करत नाहीत. यामुळे समाजातील अनेक प्रश्न मार्गी लागतात. ११ वर्षाच्या लेखन कार्यात मला अनेकदा हा अनुभव आलेला आहे. नेहमी म्हटले जाते 'सौ बका, एक लिखा' त्याप्रमाणे तुम्ही तोंडी कितीही प्रश्न मांडा, त्यावर कार्य होईलच याची शाश्वती देता येत नाही. परंतु जेव्हा लेखणीच्या माध्यमातून संबंधित मुद्द्यांना आणि प्रश्नांना वाचा फोडली जाते तेव्हा शासन असो की, प्रशासन असो त्या प्रश्नांवर, त्या मुद्द्यांवर त्यांना काम करावेच लागते. उशिराने का होईना परंतु कामे व प्रश्न मार्गी लागतातच आणि हेच पत्रकारितेचे, भारतीय लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाच्या यशस्वीतेचे गमक आहे. या यशस्वीतेमध्ये 'फुल ना फुलाची पाकळी' म्हणून मलाही किंचित का होईना आपल्या जिल्ह्यातील वृत्तपत्रे तसेच विभागीय वृत्तपत्रांमुळे थोडीशी जागा मिळाली आहे. म्हणूनच म्हणतो की, जगाच्या पाठीवर पत्रकारितेमध्ये एवढी मोकळीक कुठेही मिळत नसेल, जेवढी आपल्या बीड जिल्ह्यात मिळते. यामागे आपल्या बीड जिल्ह्यातील वृत्तपत्रे आणि संपादकांची निर्भिडता,निष्पक्षता आणि पुरोगामी व चांगले मन यांचा मोलाचा वाटा आहे.

११ वर्षाच्या मोठ्या कालखंडात दै. पार्श्वभूमी (गंमतभाऊ-चिंचोलीकरमामा), सायं. दै. लोकदिशा (किशोरजी कागदे-जबीभाई-अनिल मगर), दै. हिंद जागृती (अभिमन्यू घरत-अशोक होळकर), सा. जनशक्ती (मुहम्मद मोईज़ोद्दीन उर्फ़ जुनैद-शेख रेहान), सायं. दै. रिपोर्टर (तय्यबभाई-गणेश सावंत-मजीदभाई), दै. लोकाशा (विजयराजजी बंब), सायं. दै. सिटीझन (मुजीबभाई-चंदनभाई, रफिक पठाण), दै. चंपावतीपत्र (दिवंगत नामदेवरावमामा-सुनीलभाऊ-सुभाष चौरे सर), दै. युवा सोबती (इस्हाक़सेठ-गुलाबजी भावसार), दै. कार्यारंभ (शिवाजीराव रांजवन-बालाजी मारगुडे), दै. लोकनायक (भारत गायकवाड-विश्वंभर मुळे), दै. मराठवाडा साथी (चंदुलालजी बियाणी-संदीपजी बेदरे), सा. दिव्य आधार (शेख रिज़वान उस्ताद), दै. दिव्यअग्नी (प्रकाशजी सूर्यकर), सायं. दै. किसान (कामरान शेख-अदनान खान-फरहान शेख), सा. द स्कूल एक्सप्रेस (इरफान भाई-एजाज भाई), दै. दिव्य वार्ता (अबुबकर भाई), दै. न्याय टाईम्स (बालकिशनजी सोनी), सायं. दै. आमचा अभिमान (राजेंद्रजी होळकर-फिरोज भाई), दै. संघर्ष व अल् हिलाल टाइम्स (खमरूल इमान खान), दै. तामीर (काज़ी मखदूम), दै. झुंजार नेता (अजितजी वरपे), दै. समर्थ राजयोग (वैभवजी स्वामी), दै. लोकप्रश्न (दिलीपजी खिस्ती), दै. जगमित्र (बाळासाहेब कळबाने), दै. रणझुंजार (राजेंद्र आगवान मामा), दै. प्रजापत्र (सुनीलजी क्षीरसागर-संजयजी मालानी), दै. संकेत (नरेंद्रजी कांकरिया), दै. सुराज्य (सर्वोत्तमजी गावरस्कर), दै. पाटोदा संचार (विलासजी डोळसे), दैनिक मिल्लत मित्र (उमैर सलीम सर), सायं. दैनिक बीड प्रसार (समीर काज़ी), सायं. दै. माझी सरकार (शेख फारूक), सायं. दैनिक प्रारंभ (जालिंदर धांडे), सायं. दै. आरंभ (दीपक थोरात), दै. राज्य लोकतंत्र (नागेश मोकाशे-अनिल जाधव-अनुष्का कोंडरा), दै. सांजसुयोग (वकील सर-अखिल भाई), सायं. दै. जननेता (नंदू गायकवाड), सायं. दै. दृष्टिकोन न्यूज (राजू जोगदंड), दै. सूर्योदय (गंगाधर काळकुटे-दीपक काळकुटे), दै. दिव्य लोकप्रभा (संतोषजी मानूरकर), दै. अक्षरवार्ता (संजय हंगे), सायं. दै. विश्वनायक (बिलालभाई), सा. खरा लोकमित्र पाटोदा (हमीदभाई), सा. युवा लोकमित्र बीड (ताहेरभाई), सा. जनसूर्य (दिलीपजी तरकसे), सा. वृत्तसंवाद (राहुल पांडव), सायं. दै. सरकार (साहस आदोडे), दै. आत्ताच एक्सप्रेस (सुग्रीव मुंडे- केशव मुंडे-हमीद भाई), दै. महाभारत (विजयकुमार वाव्हळ), सा. माझी नगरी (पठाण अमर जान), दै. लोकांकित (संजय पवार), दै. प्रभास केसरी (अनुप्रिताताई मोरे) सा. लोक इच्छा गेवराई (इमाद इनामदार) या बीड जिल्ह्यातील संपादकांसह पुणे येथून प्रकाशित होणारे सायं. दै. जनमंथन (आजमतुल्ला खान-वसीम खान), लातूरहून देशभरातील उर्दू वृत्तपत्र क्षेत्रात पत्रकारिता करणारे औसा चे मुहम्मद मुस्लिम कबीर सर, अहेमदनगर येथून प्रकाशित होणारे दै. लोकमंथन (अशोकजी सोनवणे), औरंगाबाद येथून प्रकाशित होणारे हिंदी सा. शाहकार प्रभात (सय्यद रफिक), सोलापूर येथून प्रकाशित होणारे सा. कार्यसम्राट (यशवंतजी पवार), मुहम्मद ताहेर (वैचारिक दर्पण), लोकमत समूहाचे अनिल भंडारी,शेख एजाज़, सी.आर.पटेल, संतोष ठाकूर. दै. पुण्यनगरीचे अविनाश वाघीरकर. दै. दिव्य मराठीचे दिनेश लिंबेकर. दै. सकाळचे दत्ता देशमुख. दै. लोकमंथन चे देवेंद्र सिंह ढाका, धनंजय कुलकर्णी. दै. ऐतेमाद आणि रहेबर चे जावेद पाशा, दै. औरंगाबाद टाइम्सचे सिराज खान, दै. नवराष्ट्र चे रवी उबाळे, दै. साईसंध्या चे सखाराम पोहीकर, महाराष्ट्र प्रतिमा चे सय्यद इरफान. शेख अब्दुल रहेमान, इमरान शाह, इरशाद भाई, नागेश भाऊ, माजेद भाई, नंदकुमार पांडव हे सर्व संगणक तज्ञ तसेच गणेश शिंदे, रफिक खान, लातूर चे मज़हर भाई, पालम चे सोपनेमामा हे वेब पोर्टल चे संपादक, छायाचित्रकार विनोद जिरे, कृष्णा शिंदे या सर्वांचे वेळोवेळी सहकार्य आणि मार्गदर्शन मिळते.

११ वर्षांच्या मोठ्या कालखंडात पत्रकारिता क्षेत्रातील योगदानामुळे आतापर्यंत चंपावतीरत्न, पद्मपाणी प्रतिष्ठान, निर्भीड पत्रकार संघाचा जिजाऊ माँसाहेब, दैनिक प्रभास केसरी चा आदर्श पत्रकारिता, मातृभूमी प्रतिष्ठानचा आदर्श पत्रकारिता सह अन्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पत्रकारिता क्षेत्रात सर्वांचे वेळोवेळी सहकार्य आणि मार्गदर्शन मिळत असल्याने मुक्तपणे मार्गक्रमण करतो आहे. याबद्दल पुनश्च एकदा पत्रकारिता क्षेत्रातील सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. यापुढेही सर्व वृत्तपत्रे, संपादक, कार्यकारी संपादक, उपसंपादक, विभागीय वृत्तपत्रांचे जिल्हा प्रतिनिधी, संगणक तज्ञ, छायाचित्रकार या सर्वांचे सहकार्य मार्गदर्शन आणि प्रेम असेच मिळत राहतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद !

*लेखन - एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड
संपर्क - *9021 02 3121*
==================================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत