Breaking News

राज्यस्तरीय आदर्श कलाध्यापक पुरस्काराने गणेश स्वामी सन्मानित


राज्यस्तरीय आदर्श कलाध्यापक पुरस्काराने गणेश स्वामी सन्मानित

बीड (एस.एम.न्युज़) - येथील श्री नारायणगड शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्री शिवाजी विद्यालयातील  कला अध्यापक गणेश बबनराव स्वामी यांना नुकताच शहादा जिल्हा नंदुरबार या ठिकाणी कला अध्यापक राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ व नंदुरबार जिल्हा कलाध्यापक संघाच्या विद्यमाने महाराष्ट्रातील कलाद्यापकांची ४३ वी कला शिक्षण परिषद (अधिवेशन) ११ व १२ जानेवारी रोजी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे संपन्न झाली. या अधिवेशनात कलाध्यापक संघाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राज्यस्तरीय कलाध्यापक पुरस्काराचे वितरण करण्यात आले. त्यात श्री शिवाजी विद्यालयातील कलाशिक्षक गणेश स्वामी यांच्या कलाक्षेत्रातील उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन त्यांना यंदाचा राज्यस्तरीय कलाअध्यापक पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र व प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गणेश स्वामी यांना सन्मानित करण्यात आले. गणेश स्वामी यांना यापूर्वी २०१४ साली महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कारही मिळालेला आहे. या पुरस्काराबद्दल गणेश स्वामी यांचे श्री नारायणगड शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव दिनकरराव कदम, सर्व पदाधिकारी तसेच बीड जिल्हा कला अध्यापक संघटनेचे सर्व पदाधिकारी,शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र वाघमारे,उप मुख्याध्यापक राजकुमार कदम,उपप्राचार्य बि.डी. मातकर, पर्यवेक्षक रमेश सुपेकर, पर्यवेक्षक गिरीष चाळक, कैलास कला निकेतनचे प्राचार्य प्रवीण मुखेकर  व सर्व शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी त्यांचे स्वागत केले आहे.
==================================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत