कडकडत्या थंडीत नवीदोद्दीन सिद्दिकी यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस
माजलगाव (एस.एम.न्युज़) - माजलगाव नगर परिषद चे अभियंता यांचे गुत्तेदाराशी संगमत असल्याचा आरोप करत बीड जिल्हाधिकारी यांच्यामार्फत चौकशी करून दोषींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करून निकृष्ट दर्जाच्या बोगस कामाचे बील रोखावे. तसेच वरिष्ठांसह जिल्हाधिकारी व अभियंताद्वारे काम इस्टिमेट प्रमाणे आहे का? त्याची तपासणी करावी आणि माजलगाव मंजरथ रोड येथील मुरूम चोरून विकणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी नवीदोद्दीन सिद्दिकी यांनी केली असून याकरिता माजलगाव नगर परिषद कार्यालयासमोर दिनांक १६ जानेवारी २०२५ पासून आमरण उपोषण सुरू केले आहे. कडकडत्या थंडीत त्यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. तरीही त्यांच्या उपोषणाची दखल अजून घेण्यात आलेली नाही.
माजलगाव नगर परिषद अंतर्गत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानांतर्गत होत असलेले माजलगाव शहरातील मंजरथ रोड, मनुर रोड, नवीन कब्रस्तान रोड, शासकीय धान्य गोदाम रोड, बुखारी शाळा रोड व शहरात इतर ठिकाणी होत असलेले निकृष्ट दर्जाचे नाली काम, रोडच्या निकृष्ट कामाची वरिष्ठ अभियंता व इतर अधिकारी अंतर्गत चौकशी करून सदरील होत असलेले निकृष्ट बोगस कामाचे बिल रोखण्यात यावी व निकृष्ट दर्जाचे बोगस कामांमध्ये जे माजलगाव नगर परिषद चे मुख्य अधिकारी व शासकीय अभियंता आहे त्यांची चौकशी करून यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार मजदूर सेना संघटनेचे माजलगाव तालुकाध्यक्ष नवीदोद्दीन सिद्दिकी यांनी आंदोलनादरम्यान करत आहे.
==================================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा